सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर नगरपालिकेच्या २२ केंद्रांवर शांततेत मतदारांकडून गर्दी करीत रांगेत मतदान सुरू असून पहिल्या टप्प्यात २१.७५ टक्के झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजानन शिंदे यांनी दिली.
मतदान केंद्रांवर मतदारांनी थंडीचे दिवस असले तरी सकाळपासूनच गर्दी केली आहे.पहिल्या टप्प्यात कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ न होता मतदान प्रक्रिया सुरू असुन कार्यकर्त्यांची मतदारांना ने -आन करण्याची लगबग सुरू आहे.वयोवृद्ध तसेच अपंग मतदारांसाठी निवडणूक आयोगाकडून व्हीलचेअरची सोय केली आहे.सकाळी रोजगारासाठी बाहेरगावी जाणाऱ्या बहुतांशी मतदारांनी मतदान केले असल्याने मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या.
