बारामती l ज्यादा परतावा देणारी आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीला मागणी वाढली - किरण आळंदीकर
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केल्याने जागतिक पातळीवर सोने - चांदीला मागणी वाढल्याने आज जीएसटी सह १० ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख ३५ हजार ४०० रुपयांवर पोचला तर चांदीचा भावाने देखील जी एस टी सह दोन लाखांचा टप्पा पार केला असल्याची माहिती इंडिया बुलिअन & ज्वेलर्स असोसिएशनचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण आळंदीकर यांनी दिली.
सोने चांदीच्या भावाचा उचांक झाल्यानंतर
मागील काळात ऐन दिवाळी मध्ये सोने चांदीचे भाव कमी झाले होते. सोन्याचा भाव १० ग्रॅम ला तब्बल १२ हजार रुपयांनी कमी झाले होते तर चांदीचा भाव किलोला जवळपास १९ हजार रुपयांनी कमी झाले होते, ज्यांचे घरी दिवाळी नंतर लग्नकार्य होते त्या ग्राहकांनी व गुंतवणूकदारांनी बुकिंग करून, खरेदी करून कमी झालेल्या भावाचा लाभ घेतला असे हि आळंदीकर यांनी सांगितले.चांदीच्या भावाबाबत बोलताना त्यांनी सांगितले कि चीन ने सोन्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर आता चांदी मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास सुरवात केली आहे, मोबाईल, सौर ऊर्जा, बॅटरी सह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू मध्ये चांदीचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने चांदीची मागणी वाढत आहे परंतु त्या प्रमाणात पुरवठा होत नसल्याने चांदीच्या भावाने आज उचांक केला असून या पुढील काळात हि चांदीचे आणखी भाव वाढण्याची शक्यता असल्याचे सांगितले.
मागील वर्षात सोन्यातील गुंतवणूकदारांना जवळपास ४५ टक्के इतका परतावा मिळाल्याने व चांदी मध्ये हि ज्यादा परतावा मिळत असल्याने गुंतवणूकदारांनी सुरक्षित आणि अधिक चा लाभ देणारी गुंतवणूक म्हणून सोने - चांदी खरेदी करण्याकडे आपला कल वाढवला असल्याचे हि किरण आळंदीकर यांनी सांगितले.
