Indapur Breaking l पत्नी अंघोळीसाठी खोलीबाहेर पडली... पाठीमागून पतीने जोरात..! इंदापूर हादरले

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
इंदापूर : प्रतिनिधी
 इंदापूर तालुक्यातील शेळगाव (ता. इंदापूर) येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
      मंगळवारी पहाटे ही घटना घडली आहे. मनीषा मल्हारी खोमणे वय ३५ असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. पती मल्हारी उर्फ बापू खोमणे याने तिच्या डोक्यात जबर प्रहार करून तिचा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे शेळगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
       मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे साडेपाच ते सहाच्या दरम्यान मनीषा खोमणे ही अंघोळीसाठी घरातून बाहेर जात असताना संशयित आरोपी पती मल्हारी उर्फ बापू खोमणे याने पाठीमागून येत तिच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात मनीषा जागीच कोसळली आणि गंभीर जखमी झाली. कुटुंबीयांनी तातडीने तिला इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.
         घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. प्राथमिक तपासात हा खून कौटुंबिक वादातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, याबाबत अधिक तपास सुरू आहे.
        घटनेनंतर संशयीत आरोपी फरार झाला होता, मात्र पोलिसांनी शोधमोहीम राबवून त्यास ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.
To Top