Javali News l मेढा नगरपंचायत निवडणूकीसाठी ८४.२३ टक्के मतदान : किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : प्रतिनिधी
सर्वात छोटी नगर पंचायत म्हणून समजल्या जाणाऱ्या मेढा नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी आणि नगर सेवक पदासाठी एकूण ३ हजार ३९१ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला असून ८४ . २३ टक्के मतदान झाले आहे. भाजप शिवसेना गटामध्ये किरकोळ वाद झाल्याने तणापूर्ण वातावरण निर्माण झाले होते परंतु सपोनि सुधिर पाटील यांनी लगेच हस्तक्षेप करून नियंत्रण मिळविल्याने शांततेत मतदान प्रक्रिया पार पडल.

            मेढा नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी करंजेकर रेश्मा सचिन या शिवसेना (शिंदे गट), गोरे शुभांगी चित्तरंजन ( अपक्ष ) आणि वारागडे रूपाली संतोष ( भाजप ) या उमेदवार होत्या. तसेच १५ प्रभागा मध्ये प्रभाग क्रमांक १ मध्ये तांबे सुनील लक्ष्मण ( अपक्ष ), कांबळे सुशांत संपत ( भाजप ), सपकाळ विनायक दिलीप ( शिवसेना शिंदे गट ) प्रभाग क्रमांक २ मध्ये कांबळे सिमंतानी आनंदा ( अपक्ष ), सपकाळ प्रियंका अतुल ( शिवसेना शिंदे गट ), तांबे सुनिता मारुती ( भाजप ) प्रभाग क्रमांक ३ मध्ये मुकणे पुष्पा संतोष ( भाजप ), मुकणे द्रौपदा हौशा ( शिवसेना शिंदे गट ) प्रभाग क्रमांक ६ मध्ये पवार सोनाली नितीन ( शिवसेना शिंदे गट ), नलवडे आशा राजेंद्र ( राष्ट्रवादी शप ),  मिस्त्री छाया प्रसाद ( भाजप ) प्रभाग क्रमांक ७ मध्ये देशपांडे पांडुरंग दामोदर ( भाजप ),  जवळ संदीप किसन( शिवसेना शिंदे गट ), कदम प्रकाश चिमाजी ( राष्ट्रवादी शप) प्रभाग क्रमांक ८ मध्ये जवळ अश्विनी आनंदा ( भाजप ), पार्टे प्राजक्ता सुरेश ( राष्ट्रवादी शप ), पवार प्रांजली संदीप (शिवसेना शिंदे गट ) उमेदवार होते.
            तसेच प्रभाग क्रमांक ९ मध्ये पार्टे सुरेश मारुती (राष्ट्रवादी शप), दळवी पृथ्वीराज अरविंद (अपक्ष ), जवळ बापुराव एकनाथ ( शिवसेना शिंदे गट ), कदम जयदीप नारायण ( भाजप ) प्रभाग क्रमांक १० मध्ये पवार नितीन नारायण ( शिवसेना शिंदे गट ),  हरिचंद्र रामचंद्र ( भाजप ) प्रभाग क्रमांक १० मध्ये मगरे नितीन बाबासाहेब ( भाजप ) जवळ पूजा विष्णू शिवसेना  (शिंदे गट ) प्रभाग क्रमांक १२
 गोरे शिवाजी मारुती (भाजप) कुंभार सौरभ विठ्ठल ( अपक्ष ) प्रभाग क्रमांक १३  मध्ये गोरे रणधीर महादेव ( शिवसेना शिंदेगट)  देशमुख रोहित रविंद्र ( भाजप ) प्रभाग क्रमांक १४ क्षीरसागर नूतन चंद्रशेखर ( अपक्ष ), इगावे तेजस्वी सागर ( भाजप ), गोरे पुनम दत्तात्रय ( राष्ट्रवादी ) प्रभाग क्रमांक १५ मध्ये जवळ मोनिका प्रमोद ( शिवसेना शिंदे गट ),जवळ दिपाली गणेश  (भाजप ) प्रभाग क्रमांक १६ मध्ये ओतारी शुभांगी शिवाजी ( भाजप ), गायकवाड शर्वरी जयराज  (शिवसेना शिंदे गट ) आणि प्रभाग क्रमांक १७ देशमुख नितीन लक्ष्मण ( अपक्ष ),  सुर्वे संजय जयराम ( शिवसेना शिंदे गट )  देशमुख शिवाजी महादेव  ( भाजप ) उमेदवार उभे होते.
              प्रभाग क्रमांक ४ मध्ये छकुली देशमुख व प्रभाग क्रमांक ५ मध्ये आनंदी करंजेकर या भाजप च्या दोन उमेदवार बिन विरोध निवडून आल्या असून नगराध्यक्ष पदासह १५ नगर सेवकांचा विजय हा दिनांक २१ डिसेंबरला लागणार असलाने ३ अध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह १५ प्रभागातील ३९ नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.
        प्रभाग क्रमांक १ मध्ये ८६ . ५१, प्रभाग क्रमांक २ मध्ये ८५ . ६६ प्रभाग क्रमांक ३ मध्ये ८२.४४ प्रभाग क्रमांक ४ मध्ये ७८.३९ प्रभाग क्रमांक ५ मध्ये ६ ५. ८ ८ प्रभाग क्रमांक ६ मध्ये ९१.३७ प्रभाग क्रमांक ७ मध्ये ८७.६८ प्रभाग क्रमांक ८ मध्ये ८५. ९२ प्रभाग क्रमांक ९ मध्ये ८८.८४ प्रभाग क्रमांक १० मध्ये ८२.०५ क्रमांक ११ मध्ये ७८.८१ प्रभाग क्रमांक १२ मध्ये ८९. ९०  प्रभाग क्रमांक १३ मध्ये ८३.६० प्रभाग क्रमांक १४ मध्ये ८३. १५  प्रभाग क्रमांक १५ मध्ये ८ २. २६ प्रभाग क्रमांक १६ मध्ये ८८.०८ आणि प्रभाग क्रमांक १७ मध्ये ८६.७९ टक्के मतदान झाले आहे. मतदानामध्ये १ हजार ६६९ पुरुष तर १ हजार ७२२ महिलांनी मतदान केले. या निवडणूकीसाठी महिलांचा सहभाग मोठा आहे. 
           १७ प्रभागासाठी ६ ठिकाणी मतदान केंद्रात मतदान करण्यात आले. नगर पंचायती साठी ४ हजार २६ मतदार संख्या होती. निवडणूक निर्णय अधिकारी हणमंत कोळेकर व सहाय्यक निर्णय अधिकारी अजिंक्य पाटील यांच्या देखरेखेखाली मतदान प्रक्रीया पार पडली तसेच सपोनि यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
To Top