पुरंदर l पत्रकार सुनील लोणकर यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी 
पत्रकार क्षेत्रातील उल्लेखनीय सेवा, नवोन्मेषी उपक्रम आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या सामाजिक सेवेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेऊन पुणे जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघाच्यावतीने महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल भिवरी (ता. पुरंदर) गावचे सुपुत्र ,पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष, शिक्षक नेते,हॉटेल लोणकरवाडा उद्योग समूहाचे डायरेक्टर सुनील लोणकर यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला.
           निळू फुले सभागृह, राष्ट्र सेवा दल, साने गुरुजी स्मारक, पुणे येथे आयोजित कार्यक्रमात माजी आमदार, लेखक व विचारवंत उल्हासदादा पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी पुणे विद्यापीठाचे विजय खरे आणि शिक्षकेतर संघटनेचे राज्य कार्यवाह शिवाजी खांडेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
     सुनील लोणकर यांनी अनेक वर्षांपासून  सामाजिक बांधिलकी जोपासत पत्रकारिता क्षेत्रात अनमोल योगदान दिले आहे.
         सुनील लोणकर यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराबद्दल मराठी पत्रकार परिषद मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सर, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा, पुरंदर तालुक्यातील सर्व पत्रकार संघाच्या मान्यवर पदाधिकारी व सभासद बंधू भगिनी , भिवरीकर  ग्रामस्थ तसेच महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर, सेकंडरी सोसायटीचे सुधाकर जगदाळे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते कुंडलिक मेमाणे, वसंतराव ताकवले, रामप्रभू पेटकर, प्राचार्य इस्माईल सय्यद, शिक्षकनेते बाबुराव गायकवाड, प्राचार्य संदीप टिळेकर , विविध संस्था, संघटना ,पक्ष, मंडळे यांचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवर यांनी त्यांचे अभिनंदन केले.
      कार्यक्रमास शिक्षकनेते प्रसन्न कोतुळकर, सेकंडरी सोसायटीचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे, पुणे जिल्हा शिक्षक संघाचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे, पुणे जिल्हा शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष विनोद गोरे माजी अध्यक्ष, संजय धुमाळ, उपाध्यक्ष अशोक बाने, पुरंदर तालुका शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष सिद्राम कांबळे, सचिव कीर्तिकुमार मेमाणे, तसेच बबन खेडकर, विनायक होळकर, मोहन कुंभारकर, ज्ञानदेव ठोंबरे, संदीप इंदलकर, राम भोसले, दत्ता शिर्के, धनश्री कृपा नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक हनुमंत कटके पाटील, नेते हरिदास आप्पा दळवी, उद्योजक बाळासाहेब कटके, शिवाजीराव कटके आदीसह शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
    सुनील लोणकर यांच्या  उत्कृष्ट लेखनशैली, सामाजिक चळवळीतील सेवाभाव, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान, शेवटच्या घटकापर्यंत असलेला दांडगा लोकसंपर्क आणि नेतृत्वक्षमतेला मिळालेला हा पुरस्कार योग्य असा सन्मान असल्याची भावना विविध क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
     शिक्षक शिक्षकेतर संघटनेच्या वतीने उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांच्या हस्ते व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत मिळाल्याबद्दल विविध माध्यमातून माझ्यावर अभिनंदनचा अक्षरशः वर्षाव करण्यात आला.त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.आपल्या सर्वांचे स्नेही, मार्गदर्शक, तमाम शिक्षकांचे नेते शिवाजीराव खांडेकर सर व त्यांच्या सर्व आयोजक सहकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद मानतो. माझे महाविद्यालयीन शिक्षण याच परिसरात पूर्ण झाले. बऱ्याच दिवसांनी हा परिसर पुन्हा एकदा न्याहळता आला.अनेक गतस्मृती जिवंत झाल्या. अनेक वर्षापासून विविध क्षेत्रातील विषयाचे वृत्तलेखन, शिक्षक व शिक्षकेतर संघटनांचे प्रश्न , समस्या व गौरवपर कार्यक्रमाचे वृत्त संकलन करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला.त्या सेवेचे फळ मला आज मिळाले अशा भावना पत्रकार सुनील लोणकर यांनी व्यक्त केल्या.

To Top