Malegoan Sugar Factory l 'सोमेश्वर' पाठोपाठ 'माळेगाव'ची पहिली उचल जाहीर : पहिल्या हप्त्यापोटी मिळणार एवढी रक्कम

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
माळेगाव : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील 
माळेगाव सहकारी साखर कारखान्याने २०२५-२६ हंगामातील उसाच्या पहिल्या हप्तापोटी टनाला ३ हजार ३०० रुपये देण्यात येणार असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली. 
           जिल्ह्यात सोमेश्वर कारखान्याने टनाला ३३०० रुपये पहिली उचल जाहीर करत ऊस दराची कोंडी फोडली त्या खालोखाल छत्रपती कारखान्याने टनाला ३१०१ रुपये  जाहीर केले. माळेगाव च्या पहिल्या उचलीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. आज संचालक मंडळाच्या झालेल्या मासिक सभेत हा निर्णय घेण्यात आला.
To Top