Rajgad News l पानशेत धरणात पोहण्यासाठी गेलेला ३० वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
राजगड : मिनल कांबळे
पानशेत धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तीस वर्षे युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती वेल्हे पोलिसांनी दिली. तो युवक मद्यधुंद अवस्थेत असल्याने सदरची घटना घडली असल्याचे समोर आले आहे.  
              याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की सद्दाम चांद व्हसुरे (वय 30 ) राहणार घुले कॉलनी मजला 4 था नांदेड सिटी  ता  हवेली हे पानशेत धरणातील पाण्यात बुडाले याबाबत अधिक माहिती अशी की प्रकाश माळी अनिल ओवाळ राहुल गायकवाड सद्दाम व्हसुरे असे सर्व मित्र राहुल गायकवाड यांच्या चार चाकी गाडीमध्ये बसून सर्वजण प्रकाश माळी यांचे सासरवाडी माणगाव तालुका राजगड  येथे फिरण्यासाठी गेले असता तेथे त्यांची सासरी भेटल्यानंतर राहुल गायकवाड यांना भूक लागली होती तेथे घरी काय खाण्यासाठी नसल्याने त्यांनी भेळ होती म्हणून त्यानी भेळ घेऊन तेथे असलेल्या पानशेत धरणाच्या बाजूला जाऊन भेळ खात बसले त्यावेळी त्यांच्याकडे असलेली दारू सर्वजण पीत बसले त्यावेळेस सद्दाम व्हुसुरे याने देशी दारू ही कच्ची पिली व धरणामध्ये खोल पाण्यात पोहण्यासाठी गेला त्यावेळी त्याला दम लागून पाण्यामध्ये बुडाला त्यानंतर मित्र प्रकाश माळी यास पोहता येत असल्याने त्याने सद्दाम व्हसुरे यास पाण्याचे बाहेर काढले त्यावेळी तो बेशुद्ध होता त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला परंतु तो उठला नाही  सर्वांनी पानशेत पोलीस दूर क्षेत्र येथे येऊन  घटनेबाबत पोलिसांना खबर दिली घटना घडल्या ठिकाणी पोलीस आल्यानंतर सद्दाम व्हसुरे यास वेल्हे ग्रामीण रुग्णालय येथे घेऊन आले तेथे  डॉक्टरांनी त्यास तपासणी करून तो मयत झाले बाबत घोषित केले
याबाबत अधिक तपास सहाव्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मोघे करीत आहेत
To Top