सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
माळेगाव : प्रतिनिधी
आठ दिवसापुर्वी दोन मित्रांच्यात दारूच्या नशेत झालेल्या शिवीगाळ व शाब्दिक चकमकीच्या वादाचा राग मनात धरून तरुणाच्या डोक्यात व चेहऱ्यावर कुर्हाडीचे तीन ते चार घाव घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करत गंभीर जखमी केल्याची घटना बारामती तालुक्यातील पणदरे गावात घडली आहे. या गंभीर प्रकारानंतर आरोपी अनिकेत चव्हाण पोलिसांनी काही तासांत अटक केली. समिर उर्फ मोन्या आदेश गायकवाड (वय- 28),पणदरे ता.बारामती जि.पुणे असे कुर्हाडीच्या घावात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.गुरुवार (दि. 22)रोजी रात्री पाउणे बारा वाजण्याच्या सुमारास तलाठी कार्यालयासमोर ही घटना घडली.
याबाबत जखमी समीर आदेश गायकवाडची आई सुनिता आदेश गायकवाड (वय- 47), रा. पणदरे ता.बारामती जि.पुणे) यांनी आरोपी अनिकेत उर्फ वास्तव केशव चव्हाण रा.पणदरे,ता.बारामती) याच्या विरोधात अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक)अधिनियम प्रमाणे माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आठ दिवसांपूर्वी समीर गायकवाड व आरोपी अनिकेत उर्फ वास्तव चव्हाण यांच्यात वादविवाद होऊन शिवीगाळ झाली, त्यानंतर फोनवरून पुन्हा समीर गायकवाड याने आरोपी अनिकेत चव्हाणला शिवीगाळ केली. त्यानंतर झालेल्या प्रकाराचा बदला घेण्याचा ठाम निर्णय अनिकेत चव्हाण याने घेतला.
त्यानंतर गुरुवारी रात्री समीर गायकवाड तलाठी कार्यालयाजवळ एकटाच आढळून आला. त्यानंतर आरोपीने संधी साधत पुन्हा घरी जाउन कुर्हाड शर्टच्या पाठीमागे लपवून आणली. समीर जवळ जाउन त्याला बोलण्यात गुंतवून ठेवले. त्यानंतर समीर गायकवाड घरी निघाला असता आरोपी अनिकेत चव्हाण याने मागे लपवलेली कुर्हाड बाहेर काढून मागून डोक्यात दोन घाव घालून पुन्हा चेहऱ्यावर कुर्हाडीने घाव घातले.यात समीर गायक गंभीर जखमी झाला. त्यानंतर जखमी समीर गायकवाडला बारामती येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले गेले. तिथे प्राथमिक उपचार करून गंभीर जखमी झाल्याने डॉक्टरांच्या सुचणेनुसार पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आठ दिवसापुर्वी झालेल्या शिवीगाळ व शाब्दिक वादाचा राग मनात धरून माझ्या मुलास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कु-हाडीने डोक्यात वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे असे नमूद फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी अनिकेत चव्हाण याला माळेगाव पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजार केले असता 27 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे. याबाबत डॉ. सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी हे अधिक तपास करीत आहेत.
