सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
प्रतिनिधी : दिपक जाधव
सुपे वाहतुकीचे नियम हे केवळ दंडापासून वाचण्यासाठी नसून ते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आहेत.त्यांमुळे दुचाकी चालकांनी हेल्मेटचा वापर, परवाना मिळवण्याची प्रक्रिया आणि वेगावर नियंत्रण ठेवले तरच अपघात टळले जातील असे प्रतिपादन बारामती प्रादेशिक परिवहनचे सहाय्यक अधिकारी अनिल शेलार केले.
सुपे येथील विद्या प्रतिष्ठान संचालित इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये सुरक्षित वाहतूक व अपघात टाळण्यासाठी' या विषयावर शेलार यांचे व्याख्यान झाले. यावेळी ते बोलत होते. वाढते रस्ते अपघात आणि वाहतुकीचे नियम यांबाबत जनजागृती व्हावी. यासाठी अपघातांची प्रमुख कारणे स्पष्ट करत, अल्पवयीन मुलांनी वाहन चालवणे कसे धोक्याचे आहे, हे बारामती प्रादेशिक परिवहनचे सहाय्यक अधिकारी गोरखनाथ बोराडे यांनी पटवून दिले. या प्रसंगी काही व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक डॉ. योगेश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन ज्योती होले यांनी केले. तर आभार दादा राऊत यांनी मानले.
