Baramati Crime l वृद्धाला दांडक्याने मारहाण..! उपचारादरम्यान मृत्यू : वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपी अटकेत

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील कन्नडवस्ती परिसरात झालेल्या गंभीर मारहाणीच्या घटनेत ६० वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 
            याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी नारायण शिवाजी बामणे (वय ३२, व्यवसाय मजुरी, रा. विकासनगर वाणेवाडी, ता. बारामती) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजल्यापासून ते दि. १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास वाघळवाडी (कन्नडवस्ती) येथे आरोपी ऋषिकेश रणजित रावळकर (रा. कन्नडवस्ती, वाघळवाडी, ता. बारामती) याने फिर्यादीचे वडील शिवाजी शंकर बामणे (वय ६०) यांना काम नीट करत नसल्याच्या कारणावरून चिडून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने लाकडी दांडक्याने तसेच हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात शिवाजी बामणे यांच्या डोक्यावर, उजव्या डोळ्यावर व नाकावर गंभीर दुखापत झाली. मारहाणीनंतर आरोपीने पुरावे नष्ट करण्याच्या व गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने जखमी अवस्थेतील शिवाजी बामणे यांना फिर्यादीच्या घराच्या पाठीमागे बेशुद्ध अवस्थेत टाकून दिले व स्वतः कॅरी वाहनासह तेथून पलायन केले.
             गंभीर जखमी अवस्थेत शिवाजी बामणे यांना उपचारासाठी ससून रुग्णालय, पुणे येथे दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. पोलीसांनी आरोपी ऋषिकेश रावळकर यास अटक केली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे हे करीत आहेत.
To Top