सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (डिप्लोमा) येथील संगणक विभागाच्या वतीने 'नेक्स्ट जनरेशन ॲप्लिकेशन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स' या विषयावर सहा दिवसीय ऑनलाईन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे (FDP) यशस्वी आयोजन करण्यात आले. AICTE ट्रेनिंग अँड लर्निंग (ATAL) अकॅडमी, नवी दिल्ली यांच्या वतीने पुरस्कृत ही कार्यशाळा १९ जानेवारी ते २४ जानेवारी या कालावधीत पार पडली.
कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी एआयसीटीई (AICTE) न्यू दिल्ली व्यवस्थापनाचे आभार मानत, तंत्रज्ञानातील बदल या सहा दिवसीय उपक्रमात आयटी क्षेत्रातील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी आणि अनुभवी प्राध्यापकांनी उपस्थितांना सुमागो इन्फोटेकच्या पायल पाटील यांनी AI, मशीन लर्निंग आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगची ओळख करून दिली, तर रसिका जगताप यांनी 'डीप लर्निंग'वर प्रकाश टाकला.
प्रोअइयूर सॉफ्टवेअर सोल्यूशनचे बापू अर्कास यांनी 'रोबोटिक्स' मधील AI चा वापर, तर रणजित शिंदे (आवातर सिस्टम्स) यांनी 'आरपीए' (RPA) आणि 'एक्सेल ऑटोमेशन' वर सविस्तर माहिती दिली. आर.आय.टी. साखराळे येथील डॉ. एस.यू. माने (जनरेटिव्ह एआय), डॉ. सुजील ए. (मायक्रो ग्रिड सिस्टीम) आणि डॉ. आर. एम. शिंदे यांनी 'वाहनांमधील एआय' या विषयावर चर्चा केली. डॉ. संदीप थोरात यांनी एआयमधील संशोधनाच्या संधी स्पष्ट केल्या.
अमेरिकेतील ओहीयो येथून नितीन कारंडे यांनी 'हॉस्पिटॅलिटी' क्षेत्रातील AI चा वापर सांगितला, तर ओरेकल कॉर्पोरेशनचे सुधांशू पत्की यांनी 'सस्टेनेबल इंजिनिअरिंग'मधील AI च्या महत्त्वावर मार्गदर्शन केले. तसेच एआयएसएसएम पुणे येथील डॉ. रियाज अहमद जमादार यांनी 'फिनटेक' आणि 'शिक्षण' क्षेत्रातील क्रांतीवर भाष्य केले. या कार्यशाळेमुळे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) आधुनिक युगातील बदलांची सखोल माहिती मिळाली.
या सहा दिवसीय कार्यशाळेत देशातील विविध २३ राज्यांमधून एकूण ९८८ प्राध्यापक संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला यात गुजरात, दिल्ली, बिहार, पंजाब, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटक, तेलगंणा, दमन, दिव, आध प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडीसा, राजस्थान, हरियाना, हिमाचल प्रदेश, झारखंड, गोवा, जम्मू काश्मीर, छत्तीसगड, उत्तराखंड आणि महाराष्ट्र या राज्याचा समावेश आहे.
सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री पुरूषोत्तम जगताप, उपाध्यक्ष श्री. मिलिंद कांबळे, संचालक प्रतिनिधी श्री आनंदकुमार होळकर, सर्व सन्मानीय संचालक मंडळ, सचिव श्री. भारत खोमणे, प्राचार्य श्री. सोमनाथ हजारे हे उपस्थित होते प्रा. सौ. ज्योती खरात आणि प्रा. श्री. राहूल कदम यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
