Baramati News l सोमेश्वरनगरच्या डॉ. अजिंक्य शहा यांची पदव्युत्तर शिक्षणासाठी दिल्लीच्या 'बेस हॉस्पिटल' आर्मी येथे निवड

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगरच्या डॉ. अजिंक्य शहा यांची नुकतीच पदव्यूत्तर ( पी जी ) पदवी एम. एस. ई. एन. टी साठी दिल्ली येथील आर्मी च्या बेस हॉस्पिटल येथे निवड झाली असून या साठी पात्र ठरलेला सोमेश्वरनगर परिसरातील एकमेव विध्यार्थी असल्याने डॉ. अजिंक्य यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
           आर्मीच्या बेस हॉस्पिटल मध्ये प्रवेशासाठी अनेक निकष लावून संपूर्ण भारतातून मोजक्या च विध्यार्थ्यांना येथे प्रवेश दिला जातो. अजिंक्य चे प्राथमिक शिक्षण सोमेश्वरनगर च्या विद्या प्रतिष्ठान येथे झाले असून एम. बी. बी. एस. हि पदवी त्यांनी डी. वाय पाटील मेडिकल कॉलेज मधून प्रथम श्रेणी मधून उत्तीर्ण केली आहे.
डॉ. अजिंक्य चे आजोबा स्वर्गीय डॉ. सुभाष शहा 1972 पासून सोमेश्वरनगर परिसरात वैद्यकीय सेवा देण्यास सुरवात केली तर वडील डॉ. सचिन शहा व आई डॉ. सीमा शहा हे गेली 20 वर्षांपासून याच परिसरात वैद्यकीय सेवा देत आहेत.
अभ्यासातील सातत्य, शिक्षकांचे मार्गदर्शन, कुटुंब आणि सोमेश्वरनगर परिसरातून मिळालेले प्रोत्साहना मुळे  आर्मी च्या बेस हॉस्पिटल मधील प्रवेशापर्यंत पोहचू शकलो असे डॉ. अजिंक्य शहा यांनी सांगितले.
वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन, करंजेपुल पोलीस चौकी, विद्या प्रतिष्ठान, मु. सा. काकडे कॉलेज, बारामती सराफ असोसिएशन व करंजेपुल ग्रामस्थ्यांच्या वतीने डॉ. अजिंक्य शहा यांचा सत्कार करण्यात आला.
To Top