Baramati News l १७० एकरवर साकारतंय कृषी महाकुंभ : बारामतीत ११ वे कृषिक प्रदर्शन २०२६

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
बारामती : प्रतिनिधी 
बारामती कृषी विज्ञान केंद्राने 'एआय' तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला योग्य दिशा दिली आहे. या क्रांतिकारक नव्या प्रकल्पाबरोबर शेती आणि पूरक व्यवसायांची प्रात्यक्षिके पाहण्याची संधी 'कृषिक प्रदर्शन २०२६' मध्ये मिळणार आहे.यंदाचे कृषिप्रदर्शन १७ ते २४ जानेवारी या कालावधीत प्रदर्शन होणार आहे. यंदा कृषक चा कालावधी वाढला असून आठ दिवस प्रदर्शन भरवले जाणार आहे.कृषिक’ हे जगातील सर्वात मोठे प्रात्यक्षिक आधारित कृषी प्रदर्शन यंदा आपल्या ११ व्या वर्षात पदार्पण करत आहे.

१७० एकर प्रक्षेत्रावर प्रदर्शन भरणार असून दरवर्षी देशभरातून अडीच ते तीन लाख शेतकरी या प्रदर्शनाला भेट देतात. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते (दि.१७) रोजी उद्‌घाट्न होणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, रोहित पवार यांची उदघाटनाला उपस्थिती असेल, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेचे सीईओ निलेश नलावडे उपस्थित होते. यंदाच्या कृषी प्रदर्शनात AI तंत्रज्ञान आधारित सुरु उसाचे २०० टन तर खोडवा उसाचे १५० टनाचे प्रत्येशिक शेतकऱ्यांना पाहण्यास मिळणार आहे. शेतकऱ्यांना देश विदेशातील आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन ,निविष्ठांच्या माहितीचा खजिना, विविध पिकांचे प्रात्यक्षिके पाहण्याची संधी कृषकच्या माध्यमातून मिळणार आहे. प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजेंद्र पवार यांनी केले आहे. आतापर्यंत २० लाख शेतकऱ्यांनी कृषिकला भेट दिल्याची नोंद आहे.

राजेंद्र पवार म्हणाले, केव्हीके बारामतीचा एआय ऊस शेती प्रकल्प दाखवितो की, परंपरेला विज्ञानाची जोड दिल्यास शेती समृद्ध, आधुनिक आणि टिकाऊ होऊ शकते. हा प्रकल्प केवळ तांत्रिक प्रयोग न राहता, भारताच्या कृषी भविष्याची दिशा ठरविण्यास आदर्श मॉडेल ठरत आहे. त्यामुळे शेती क्षेत्रातील रचलेला हा एक नवा इतिहास उलगडून पाहण्याची संधी यंदा कृषिकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.
To Top