Pune News l वकिलांनी कायदेशीर दस्त करताना काळजी घ्यावी : ॲड. हर्षद निंबाळकर

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम---- 
पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्रात यंदा केंद्र सरकार द्वारे मोठ्या प्रमाणात नोटरी वकिलांची नेमणूक करणेत आली आहे.त्यामुळे नवोदित नोटरी वकिलांनी कायदेशीर दस्त करताना काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे.असे मत बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा चे चेअरमन ॲड हर्षद निंबाळकर यांनी पुणे येथे व्यक्त केले.
           नोटरी प्रॅक्टिशनर असोसिएशन महाराष्ट्र राज्य च्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी बार कौन्सिलचे सदस्य राजेंद्र उमाप, माजी चेअरमन ए यू पठाण,असोसिएशन चे प्रदेशाध्यक्ष ॲड हरीश तावरे,कार्याध्यक्ष ॲड इब्राहीम अब्दुल शेख,पुणे वकील संघटना अध्यक्ष ॲड हेमंत झंझाड, ॲड दीपक चौधरी, ॲड पांडुरंग ढोरे पाटील, ॲड सुफीयान शेख, ॲड भूपेंद्र गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. पुणे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमात ॲड. हर्षद निंबाळकर पुढे म्हणाले की एखादी व्यक्ती ओळखीची आहे म्हणून सहज नोटरी करू नका कारण चुकीची नोटरी झालेस न्यायालयात मोठे वाद निर्माण होतात.नोटरी वकील जरी जास्त नियुक्त झाले असले तरी कामात ही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून प्रत्येकाने काळजीपूर्वक काम करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. असोसिएशनचे कार्याध्यक्ष ॲड इब्राहीम अब्दुल शेख यांनी प्रास्ताविकांमध्ये नोटरी वकिलांना येणाऱ्या समस्या व त्याबाबत असोसिएशन तर्फे केली जाणारी कामे याबाबत माहिती दिली.

 ॲड. गणेश आळंदीकर यांनी नवोदित नोटरी बंधूंना येणाऱ्या समस्या कशा सोडवायच्या याबाबत व नोटरी कायदा कलम १३ द्वारे नोटरी बंधूंना असलेले संरक्षण याविषयी विविध खटल्यांचा दाखला देऊन माहिती दिली. प्रदेशाध्यक्ष ॲड. हरीश तावरे यांनी स्वागत केले. यावेळी ॲड. गणेश आळंदीकर यांची पुणे जिल्हा संघटक पदी तर ॲड.स्वाती गिरंजे यांची पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षा पदी निवड झाली.पुणे येथील ॲड आरती गोरडे यांचे शहर सचिव पदी निवड झाली.याबरोबर विविध पदाधिकारी यांची निवड करून वकील संघटनेचे राज्याचे अध्यक्ष ॲड हर्षद निंबाळकर यांचे व मान्यवरांचे हस्ते नवनियुक्त पदाधिकारी यांचा सन्मानचिन्ह शाल व प्रमाणपत्र देऊन सत्कार करणेत आला.सूत्रसंचालन ॲड. राणी सोनवणे, ॲड. श्रुती संकपाळ कांबळे,ॲड. धनश्री बोरडे ई नी केले. यावेळी ॲड. पांडुरंग ढोरे पाटील, ॲड. दीपक चौधरी,ॲड. भूपेंद्र गोसावी, ॲड वनमाला अनुसे आदी मान्यवर उपस्थित होत्या.
Tags
To Top