सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
पुणे जिल्हा परिषद व बारामती पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपा तसेच दोन्ही शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यामुळे बारामती तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, निवडणूक रणधुमाळीला वेग आला आहे.
पक्ष नेतृत्वाने सामाजिक समतोल, महिला प्रतिनिधित्व आणि स्थानिक कार्यकर्त्यांना संधी देण्यावर भर देत उमेदवारांची निवड केल्याचे चित्र आहे. अनेक गट-गणांमध्ये अनुभवी चेहऱ्यांसह नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत सुपा, गुणवडी, पणदरे, निंबुत, कांबळेश्वर, निरावागज आदी गटांसाठी तसेच बारामती पंचायत समितीतील विविध गणांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. बारामती तालुक्यात ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता असून, विरोधी पक्षांकडूनही जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात प्रचार सभांमधून आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवार यादीमुळे कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी ही निवड महत्त्वाची ठरणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. आता मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने झुकतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
-------------------
अधिकृत उमेदवार----
सुपा-काऱ्हाटी गट : पल्लवी प्रमोद खेत्रे
सुपागण : उज्ज्वला पोपट खैरे, काऱ्हाटी गण : श्यामल वाबळे, गुणवडी-शिर्सुफळ गट : शुभांगी कचर शिंदे,
शिर्सुफळ गण :
गुणवडी गण : शुभांगी आगवणे, पणदरे-मुढाळे गट : मंगेश प्रतापराव जगताप,
पणदरे गण : किरण रावसाहेब
तावरे,
मुढाळे गण : वैशाली कोकणे,
वडगाव निंबाळकर-मोरगाव गट : रोहिणी संदीप कदम (ढोले), वडगाव निंबाळकर गण : जितेंद्र पवार,
मोरगाव गण : रावसाहेब चोरमले,
निंबूत-कांबळेश्वर गट : करण संभाजीराव खलाटे,
निंबूत गण : दिग्विजय जगताप, कांबळेश्वर गण : आशा विठ्ठल
वायाळ,
निरावागज- डोर्लेवाडी गट : शिवानी अभिजीत देवकाते,
निरावागज गण : नितीन काकडे,
डोर्लेवाडी गण : राजश्री टकले
