सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करत निवडणूक रणांगणात ठामपणे उडी घेतली आहे. चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गणांसाठी उमेदवार निश्चित करण्यात आले असून, यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली आहे. तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गणांसाठी उमेदवार जाहीर झाल्याने निवडणूक प्रचाराला वेग आला असून, इतर पक्षांच्या हालचालींनाही चालना मिळाली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी निरा–कोळविहीरे गटातून प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे, बेलसर–माळशिरस गटातून गौरव विजय कोलते, वीर–भिवडी गटातून पुष्कराज संजय जाधव, तर दिवे–गराडे गटातून रुपाली अमोल झेंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे.
तसेच पंचायत समिती पुरंदर अंतर्गत आठ गणांसाठीही उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. निरा गणातून मोनिका स्वप्नील कांबळे, कोळविहिरे गणातून स्मिता संतोष निगडे, माळशिरस गणातून अजिंक्य रामदास कड, बेलसर गणातून निलेश कृष्णा जगताप, वीर गणातून उत्तम महादेव धुमाळ, भिवडी गणातून अनुजा अमोल पोमण, दिवे गणातून अमित भाऊसो झेंडे, तर गराडे गणातून अर्चना ज्ञानेश्वर कटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते, सामाजिक कार्याचा अनुभव आणि जनाधार लक्षात घेऊन उमेदवारांची निवड केल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. येत्या निवडणुकीत विकास, पारदर्शक प्रशासन, शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर भर देत पक्ष निवडणूक रिंगणात उतरला असल्याचे चित्र आहे.
या उमेदवारांच्या घोषणेमुळे पुरंदर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत असून, आगामी काळात प्रचार आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तालुक्यात आपली ताकद दाखवण्यासाठी संघटनात्मक बांधणीवर भर दिला असून, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याची तयारी सुरू केली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जालींदर कामठे यांनी ही अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करत सर्व कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले आहे. “पुरंदरच्या विकासासाठी सक्षम आणि अनुभवी नेतृत्व देण्याचा प्रयत्न पक्षाने केला असून, मतदार नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
