Rajgad News l तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी ९ तर पंचायत समितीसाठी १५ उमेदवारी अर्ज दाखल

सोमेश्वर रिपोर्टर live
 सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातून जिल्हा परिषदे साठी 9 व पंचायत समिती साठी 15 अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अमिता तळेकर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार निवास ढाणे यांनी दिली.
                  वेल्हे वांगणी जिल्हा परिषद गटासाठी भारतीय जनता पार्टी कडून शिवाजी बाबासो चोरघे, तानाजी दगडू मांगडे, सागर तानाजी मांगडे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून गोरक्षनाथ शंकर भुरुक यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पंवार गटाकडून आणि शंकर कृष्णा रेणुसे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर विंझर पानशेत गटासाठी भारतीय जनता पार्टी कडून शिवराज चंद्रकांत शेंडकर, भगवान ज्ञानोबा पासलकर यांनी एक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि एक अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तसेच अनंता रेवणनाथ दारवटकर यांनी देखील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
पंचायत समिती साठी वांगणी गाणासाठी भारतीय जनता पार्टी कडून विशाल मारुती वालगुडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पंवार गटाकडून हनुमंत राजाराम कार्ले, विजय बाबासाहेब चोरघे यांनी एक फॉर्म उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून भरले आहेत 

विंझर गणातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून अभिषेक शिवाजी शेंडकर भारतीय जनता पार्टी कडून गणेश नामदेवराव जागडे, राजू प्रभाकर रेणुसे यांनी अपक्ष एक आणि एक भारतीय जनता पार्टी कडून तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून दिलीप महादेव रेणुसे, तुषार ज्ञानोबा जावळकर 

पानशेत गणासाठी भारतीय जनता पार्टी कडून सीमा विष्णू राऊत भाग्यश्री रमेश मरगळे तर  आशा अंकुश पासलकर यांनी एक फॉर्म राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून व दुसरा भारतीय जनता पार्टी कडून भरलेला आहे. वेल्हे गणासाठी केवळ एकच सुवर्णा हेमंत राजीवडे  यांचा फॉर्म आलेला आहे
To Top