सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर l प्रतिनिधी
ज्युबिलंट इंग्रेव्हिया लिमिटेड आणि ज्युबिलंट भारतीय फाऊंडेशन व रेड प्लस ब्लड सेंटर, भोसरी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय रक्तदाता महिना-सामाजिक कारणासाठी रक्तदान शिबिराचे दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी ज्युबिलंट कंपनीचे जेआरसी हॉल, येथे आयोजन केले आणि त्याला 68 रक्तदात्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला,
ज्युबिलंट इंग्रेव्हिया लिमिटेडचे प्रमुख अधिकारी , साइटचे प्रमुख डॉक्टर योगेश कोपरकर, एचआर प्रमुख दीपक सोनटक्के, प्रशासन प्रमुख सूर्यकांत पाटील, संगिता जाधव, ईएचएस प्रमुख विनोद होंगेकर, सर्व विभागीय प्रमुख, आणि कर्मचारी तसेच डॉ विनोद मोडासे , अजय ढगे आणि रेड प्लस रक्त केंद्र कर्मचारी आणि ज्युबिलंट वर्कर्स युनियन यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे शिबिर यशस्वी झाले.
अशी माहिती ज्युबिलंट इंग्रेव्हिया सहयोगी संचालक इसाक मुजावर यांनी दिली.
