Beed News l शेतकऱ्यांना मिळणार 'स्टेट बँके' चे अर्थबळ..! आमदार सुरेश धसांच्या पाठपुराव्यामुळे दूध व्यवसायाला मिळणार आधुनिकतेची जोड

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
बीड : प्रतिनिधी 
आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आमदार सुरेश धस यांनी ठोस पावले उचलली आहेत. बीड येथे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेऊन दुग्ध व्यवसायातील अडचणींबाबत सविस्तर चर्चा केली.
               जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांचीही उपस्थिती होती. मतदारसंघात शेतीसोबत दुग्ध व्यवसाय हे शेतकऱ्यांचे मुख्य उत्पन्नाचे साधन आहे. मात्र, पशुसंवर्धन विभागाकडे उच्च दूध उत्पादनक्षम गाईंसाठी आवश्यक दर्जेदार सिमेन उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दूध उत्पादन मिळत नाही. वर्ल्ड वाईड सायर्स' प्रजातीच्या वळूचे सिमेन खाजगी बाजारात उपलब्ध आहे. हे सिमेन वापरल्यास अधिक दूध देणाऱ्या, तंदुरुस्त आणि दीर्घकाळ उत्पादनक्षम गाई जन्माला येतात. मात्र या सिमेनची किंमत जास्त असल्याने दुग्ध व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा यासाठी मुक्त गोठा पद्धत आणि ऑटोमेशन आधारित यंत्रणा राबवण्यासाठी कर्जपुरवठ्याबाबतही चर्चा झाली. 

भारतीय स्टेट बँकेचे विभागीय व्यवस्थापक अमित धुळेयांनी शेतकऱ्यांना आवश्यक आर्थिक मदत देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली.
Tags
To Top