Baramati Panchayt samiti l वाघळवाडीचे मा. उपसरपंच जितेंद्र संकुडे..! यांनी पक्षाकडे मागितली उमेदवारी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
बारामती : अक्षय इथापे
बारामती तालुक्यात आगामी पंचायत समिती निवडणुकीचे वारे वाहू लागले असून..! नींबूत पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली आहे. वाघळवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच जितेंद्र सकुंडे यांनी आज अधिकृतपणे पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली असून, यामुळे नींबूत गणातील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे.
                   जितेंद्र सकुंडे यांनी आज पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली दावेदारी मांडली. वाघळवाडीचे उपसरपंच म्हणून काम करताना त्यांनी राबविलेले विकासप्रकल्प आणि गणातील सर्वसामान्य जनतेशी असलेला त्यांचा थेट संवाद, या जोरावर त्यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळेल आणि पक्षाच्या माध्यमातून गणाचा विकास साधता येईल..! वाघळवाडीचे उपसरपंच म्हणून त्यांनी स्थानिक राजकारणात आणि विकासकामांत आपला ठसा उमटवला आहे. 

नींबूत गण हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. या ठिकाणाहून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक दिग्गज इच्छुक आहेत, मात्र जितेंद्र सकुंडे यांनी आज प्रत्यक्ष उमेदवारीची मागणी केल्याने इतर इच्छुकांच्या गोटात खळबळ उडाली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते आता कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालतात, याकडे संपूर्ण बारामती तालुक्याचे लक्ष लागले आहे.
To Top