सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीची घोषणा झाल्याने भोर तालुक्यातील राजकीय पक्षांसह सर्व घटकांनी निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आदर्श आचारसंहितेचे पालन करावे.निवडणूक निर्भय वातावरण,शांतता व सुव्यवस्थेत पार पडण्यासाठी सहकार्य करावे.तसेच मतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन प्रांताधिकारी डॉ.विकास खरात यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र नजन यांनी केले.
निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखेची मंगळवार दि.१२ घोषणा केल्यानंतर भोरचे सहायक निवडणूक अधिकारी राजेंद्र नजन यांनी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसाठी बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी पोलीस निरीक्षक अण्णा पवार,गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट,अमोल पांगारे,संतोष धावले,रवींद्र कंक,लहूनाना शेलार, रवींद्र बांदल,गणेश खुटवड आदींसह विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.नजन पुढे म्हणाले निवडणुकीच्या घोषणेबरोबरच आचारसंहिता लागू झाली आहे.त्यामुळे सार्वजनिक ठिकाणे, शासकीय व खासगी जागेवरील अनधिकृत फलक,फ्लेक्स, झेंडे काढण्याच्या सूचना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्या आहेत. येत्या ४८ तासांत सर्व ठिकाणी ही कारवाई केली जाईल.
