सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
मानवी जीवनात दानाचे महत्त्व अनमोल आहे. परंतु ज्या दानाने कुणाचे आयुष्य वाचते ते रक्तदान सर्वश्रेष्ठ पुण्य ठरते.समाजात मायक्रोसाइटिक,सिकलसेल,थैलेसिमिया,ब्लड कॅन्सर,किडनी फेल्युअर अशा गंभीर आजारांशी झुंजणारे हजारो रुग्ण रक्ताच्या एका थेंबासाठी तडफडत असतात.अशावेळी रक्तदाते होऊन त्यांचे देवदूत ठरून एक रक्ताचा थेंब दुसऱ्याचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो असे मत नगराध्यक्ष रामचंद्र आवारे यांनी व्यक्त केले.
भोर तालुका सेवा समिती यांच्यावतीने जगद्गुरु श्रीमद रामानंदचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या जीवनदान महाकुंभ उपक्रमांतर्गत आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मंगळवार दीन दि.१३ आवारे बोलत होते.रक्तदान शिबिरात ७२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना भारती हॉस्पिटल रिसर्च सेंटर या ब्लड बँकेकडून ब्लड डोनेशनचे सर्टिफिकेट देण्यात आले. रक्तदान शिबिरावेळी महिलांचा सहभाग मोठा होता. यावेळी नगरसेवक जयवंत शेटे,अध्यक्ष भरत कुडले,संभाजी कुडले,अशोक खोपडे,चंद्रकांत शिवतरे,डॉ.पांडुरंग पवार,दत्तात्रय कांबळे,अनिता पानसरे,शकुंतला किंद्रे,सुनीता खोपडे आदींसह सेवेकरी उपस्थित होते.
