Baramati News l जिल्हा परिषदच्या रणसंग्रामात 'सोमेश्वर'चे संचालक ऋषी गायकवाड..! निंबुत-कांबळेश्वर गटातून पक्षाकडे मागितली उमेदवारी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
बारामती : प्रतिनिधी 
राजकारण हा केवळ नेत्यांचा प्रांत नसून, तिथल्या प्रत्येक निर्णयाचा थेट प्रभाव सर्वसामान्यांच्या आयुष्यावर पडत असतो. ज्याला जनतेचे प्रश्न समजतात आणि त्या सर्वांना सोबत घेऊन विकास करण्याची जिद्द असते, त्यानेच राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगणे गरजेचे आहे, अशा ठाम भूमिकेतून युवा नेतृत्व ऋषिकेश शिवाजीराव गायकवाड यांनी आज निंबूत-कांबळेश्वर जिल्हा परिषद गटामधून उमेदवारी अर्ज दाखल केला.

            आपल्या भावना व्यक्त करताना ऋषिकेश गायकवाड म्हणाले की, विकासाचे समीकरण जुळवून आणण्यासाठी आणि सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी या निवडणुकीच्या माध्यमातून सक्रीय राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. जनसेवेचा वारसा अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी आणि भागाचा कायापालट करण्यासाठी पक्षाकडे संधी मागितली असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
ऋषिकेश गायकवाड यांनी अर्ज दाखल केल्याने या गटात नव्या उर्जेची लाट पाहायला मिळत असून, तरुणांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. संधी मिळाल्यास आणखी जोमाने काम करण्याची माझी तयारी आहे आणि या प्रवासात आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद पाठीशी असावेत..!असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या उमेदवारीमुळे निंबूत-कांबळेश्वर गटात आता राजकीय हालचालींना वेग आला असून, गायकवाड यांच्या रुपाने एक सुशिक्षित आणि अभ्यासू चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
To Top