सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाचे वर्चस्व राहिल्याने भोर नगर परिषदेसमोर भाजपाचे कार्यकर्ते तसेच उपनगराध्यक्ष,नगरसेवकांनी फटाक्या फोडून पेढेवाटीत जल्लोष व्यक्त केला.
उपनगराध्यक्ष ॲड.जयश्री शिंदे बोलताना म्हणाल्या भाजप सरकारच्या माध्यमातून राज्यात सर्वत्र विकास कामे सुरू आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकास कामांचा धडाका तसेच कामाची कार्यपद्धती पाहून जनतेने राज्यातील महानगरपालिकेत पुन्हा एकदा बदल घडवल्याने बहुतांशी महानगरपालिका भाजपाच्या ताब्यात आले आहेत.यावेळी गटनेते अमित सागळे,नगरसेवक मनीषा पवार,स्नेहल घोडेकर,सुमंत शेटे,गणेश मोहिते,तौशिफ आतार,प्रशांत जाधव,रेणुका बदक, जगदीश किरवे,तृप्ती सुपेकर,मयुरी गायकवाड,जयवंत शेटे,कुणाल पलंगे,पल्लवी सागळे,सचिन तारु,मनिषा भेलके,स्नेहल पवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
