सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून येथील विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांनी केले.
बारामती तालुक्यातील बाबुर्डी येथे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप बांदल, युवक तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पोमणे आणि चांडाळ चौकडीच्या करामतीचे रामभाऊ जगताप आदी मान्यवरांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संदीप बांदल बोलत होते.
यावेळी बांदल व पोमणे यांची तालुकाध्यक्षपदी तर जगताप यांना डॉक्टरेट मिळाल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती भाऊसाहेब करे, माजी उपसभापती बाळासाहेब पोमणे, येथील सरपंच दत्तात्रय ढोपरे, पळशीचे सरपंच रावसाहेब चोरमले, अनिल लडकत, अशोक लोणकर, राजकुमार लव्हे, प्रमोद खेत्रे,, शांताराम ढोपरे, पुरुषोत्तम पोमणे, अंकुश लडकत, प्रताप जगताप, देवराज पोमणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक लक्ष्मण पोमणे यांनी केले. तर आभार ज्ञानेश्वर पोमणे यांनी आभार मानले.
