सुपे परगणा l जिल्हा परिषदेच्या सीईओकडुन कुतवळवाडी गावची पहाणी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
जिल्हा परिषदेचे सीईओ गजानन पाटील यांच्या माध्यमातून बारामती तालुक्यातील कुतवळवाडी / बोरकरवाडी गावची नुकतीच पहाणी केली. 
            यावेळी गटाविकास अधिकारी किशोर माने, सहाय्यक गटाविकास अधिकारी नंदन जराडे, विस्ताराधिकारी भीमराव भागवत यांनी येथील गावची मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियांतर्गत गावची पहाणी केली. 
           यावेळी येथील शेतकरी अविनाश मेमाणे यांच्या गुलाब फुलांच्या शेतीस भेट दिली. तसेच येथील प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल असलेले लाभार्थी आप्पासो सोनबा बोरकर यांच्या घरकुलाचा गृहप्रवेश मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
          यावेळी येथील अंगणवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रंगरंगोटी करून सुसज्ज करण्यात आली होती. यावेळी अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद सादला. तसेच कुतवळवाडी, बोरकरवाडी येथील स्मशानभूमी पाहणी करून सीईओ पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
             कुतवळवाडी येथील श्री भैरवनाथ मंदिरात आधार फाउंडेशन मांजरी बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी शिबिर व चष्मा वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत कुतवळवाडी सभागृहात महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना अनुदान वाटप करण्यात आले. तर क्यूआर कोडद्वारे करवसुली करणेकरीता घरोघरी क्यूआर कोड वाटप केले. यावेळी तुषार  कुतवळ यांनी स्वतः च्या घरून क्यूआर कोड द्वारे ग्रामपंचायतीची घरपट्टी भरली.
          मुख्यमंत्री सम्रुद्ध पंचायत राज अभियान राबविण्यात आलेले सर्व उपक्रमांची माहिती घेऊन उर्वरित कामाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी १५ वा वित्त आयोग अंतर्गत ओला कचरा व सुका कचरा पेटी वाटप करण्यात आले.
          याप्रसंगी सरपंच रूपाली भोसले, उपसरपंच राणी बोरकर, सदस्य भानुदास बोरकर, किरण बोरकर, अतुल कुतवळ, दीपाली बोरकर, दत्तात्रय कदम, भाऊसाहेब भोसले, पांडुरंग कुतवळ, अजय कुतवळ, अमित कुतवळ आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.   
To Top