सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील वढाणेत येथे शनिवारी ( दि. ०३ ) मध्यरात्रीच्या दरम्यान शेतकऱ्याच्या विहिरी लगत बिबट्याचा वावर आढळुन आल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले.
या परिसरात ग्रामस्थांनी लागलीच घटनास्थळी पहाणी केली. यावेळी एका घोड्यावर हल्ला करून फरफटत घेऊन गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाच्या वतीने प्राण्याच्या पायाच्या ठशांची माहिती घेण्याचे काम सुरु आहे.
या ठिकाणी एका विहिरी जवळ सीसीटीव्हीत बिबट्या सदृश्य प्राणी आढळून आला. त्यानंतर वढाणेतील इनामावस्तीवरील बबन लकडे यांनी शेतात बांधलेल्या घोड्यावर या प्राण्याने हल्ला केला. घोड्याच्या गळ्यावर हल्ला करून पाठीमागचा भागाचे लचके तोडत त्याला फरफटत घेऊन गेला. येथील शेतकऱ्याच्या कांदा पिकात या प्राण्याचे ठसे आढळून आले आहेत. कालच कोळोलीच्या सीमेलगत हिंगणीगाडा हद्दीत लोंढे यांच्या गाई वर हल्ला केल्याची घटना घडली आहे.
येथील इनामवस्तीवरील वीस ते पंचवीस विद्यार्थी सुमारे तीन किलोमीटर वरील कौलेवाडी येथील प्राथमिक शाळेत जातं आहे. त्यामुळे या घटनेने घाबराटीचे वातावरण झाले आहे.
दरम्यान मोरगाव प्रादेशिक वनविभागाचे वनपाल शितल बागल, वनरक्षक दयानंद अवघडे, वनसेवक जी. एन. भोंडवे, एस. पी. दिवटे तर पुण्याची रेस्क्यु टीमचे नचिकेत अवधाने यांनी घटनास्थळी पहाणी केली. यावेळी वढाणे आणि हिंगणीगाडा येथे हल्ला झाला आहे तो एकाच प्राण्याने केला असल्याचा संदर्भ बागल यांनी दिला.त्यानंतर त्यांनी वढाणे आणि पडवी सीमेवर ठसे आढल्याचे त्यांनी सांगितले.
.................................
