सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
माणसाने चांगले सत्कर्म केल्यास जीवनात आनंदच मिळत राहील असे प्रतिपादन ग्रामीण कथाकार प्रा. रविंद्र कोकरे यांनी केले.
सुपे (ता. बारामती) येथील जीवन साधना फाउंडेशन संस्थेच्या वतीने प्राजक्ता विद्यालयात प्राजक्ता हीच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेल्या 'प्राजक्ता' व्याख्यानमालेचे पहिले पुष्प कोकरे यांनी गुंफले.
यावेळी "हास्यकरंजी " या विषयावर प्राध्यापक कोकरे यांनी हसत खेळत अगदी समर्पकपणे समाजातील अंधश्रद्धा, वाईट रूढी परंपरांमधून बाहेर पडण्यासाठी नेमकं काय केले पाहिजे, याबाबत उपस्थितांना अगदी मोजक्या शैलीत उदाहरणासह पटवून दिले. ते म्हणाले की चिंता कारण्यापेक्षा चिंतानावर भर द्या. चांगल्या व्यक्ती, चांगली पुस्तके, चांगल्या व्यक्ती च्या सहवासात राहिले तर जीवन आनंदी राहील असे त्यांनी सांगितले.
यावेळी पत्रकारदिनाचे औचित्य साधून चौथा स्तंभ असलेले पत्रकार जयराम सुपेकर, दिपक जाधव, सचिन पवार आदिॅंचा सन्मान संस्थेच्यावतीने करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्याचे सरपंच तुषार हिरवे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सपोनि मनोजकुमार नवसरे, पुणे जिल्हा पत्रकार संचाचे अध्यक्ष सुनील लोणकर, आडत व्यापारी सुभाष चांदगुडे उपस्थित होते.
याप्रसंगी बाजार समितीचे संचालक अरुण सकट, सूर्यकांत खैरे, संस्थेचे सचिव श्रीप्रसाद वाबळे, गणेश खैरे, अरुण कुतवळ, आर. के. चांदगुडे, कविवर्य हनुमंत चांदगुडे, मच्छिंद्र गिरमे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक बसाळे यांनी केले. व्याख्यात्यांचा परिचय व्यवस्थापक गणेश भुजबळ यांनी केला. तर आभार प्रकाश चांदगुडे यांनी मानले.
......................................
