Sambhajinagar Breaking l एमआयएमच्या पदयात्रेत मोठा राडा; इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला, कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
संभाजीनगर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर मधील बायजीपुऱ्यात एमआयएम चे कार्यकर्ते आणि एमआयएमचे नाराज कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला आहे. एम आय एम कार्यकर्ते आणि नाराज असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली असून नाराज कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला चढवला असून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे संभाजीनगरमध्ये मोठा राडा झाला आहे.

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज अली यांची आज संभाजीनगमध्ये पदयात्रा होती. या पदयात्रेला सुरूवातीपासून विरोध होत होता त्यांच्यासमोरच हा राडा झालेला आहे. त्याला काळे झेंडे दाखवण्यात आले. त्यानंतर अडवण्याचाही प्रयत्न झाला. त्यावेळी दोन गटांमध्ये हमारीतुमरी होऊन हाणामारी झाली. त्यावेळी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
नेमका हल्ला कसा झाला..?


जलील यांची गाडी जात असताना नाराज कार्यकर्त्यांनी त्यांच्या थार गाडीवर हल्ला केला. ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी इम्तियाज जलील हे कारच्या पुढील सीटवर बसले होते. त्यावेळी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आणि त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुदैवाने इम्तियाज जलील यांना कोणतीही दुखापत झाली नाही. यावेळी इम्तियाज जलील यांच्या गाडीत बसलेल्या कार्यकर्त्याच्या डोळ्याला जखमा झाल्या आहेत.प्रचार रॅलीदरम्यान ही घटना घडली आहे.
 ‌ या घटनेनंतर संभाजीनगमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. इम्तियाज जलील यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस उमेदवार करीम कुरेशी यांनी हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप केला आहे. आमच्या भागात अरेरावीची भाषा केली त्यामुळ हा प्रकार घडला, असे कुरेशी यांनी म्हटले आहे. संभाजीनगरमध्ये एमआयएमने 22 माजी नगरसेवकांची तिकिट कापून नव्या उमेदवारांना संधी दिली आहे. ज्यावेळी उमेदवारी झाली त्यावेळी देखील राडा झाला होता. आजही त्याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळतात.
To Top