Phaltan Accident l एस.टी. बस व दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू : बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : निलेश काशीद
लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोणंद- फलटण रोडवर हाॅटेल शिवार गार्डन परिसरात एस.टी. बस व दुचाकीच्या झालेल्या अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात एस.टी. बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार दि. 22 जानेवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास मौजे कापडगाव, ता. फलटण हद्दीत हॉटेल शिवार गार्डन परिसरात हा अपघात झाला. एस.टी. महामंडळाची बस (क्रमांक MH-20 BL 4060) निष्काळजीपणे विरूद्ध बाजूने हाॅटेल शिवार याठिकाणी  वळण घेत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार अमोल मनोहर बोडरे (वय 33, रा. तडवळे, ता. फलटण, जि. सातारा) हे गंभीर जखमी झाले. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

अपघातग्रस्त बस चालक संदीप आसाराम शिरसाठ (वय 35, रा. नवतानगर, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) याच्याविरोधात शिवाजी मारूती भंडलकर रा. तडवळे यांनी फिर्याद दिली असून लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास लोणंद पोलीस करीत आहेत.
To Top