Baramati News l सुपा येथे पत्रकाराला धमकावण्याचा प्रकार : पत्रकार संघटना आक्रमक

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : प्रतिनिधी 
संपूर्ण राज्यात नुकत्याच जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय. मात्र या दरम्यान बारामतीच्या काही गावात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पत्रकारांना दमबाजी होत असल्याची घटना आज समोर आली आहे. सुपा येथे एका पत्रकाराला स्थानिक प्रतिष्ठित राष्ट्रवादीचे पुढारी यांनी आमच्या मनाप्रमाणे बातम्या लागत नाही. आम्हाला विचारून बातम्या द्या याचा राग मनात धरत जाब विचारल्याचा प्रकार नुकताच समोर आला. या संबंधितांविरुद्ध तत्काळ कारवाई करा असा पवित्र बारामती तालुका पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात आला आहे.

      बारामती तालुक्यात राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा गट व ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब या दोन्ही पक्षाच्या संयुक्तपणे काही उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. या येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जनमताचा कौल व एकूणच सर्व परिस्थिती विचारात घेऊन पक्षांना उमेदवार निश्चित केले. 

      येथील वास्तववादी राजकीय घडामोडी बाबत विविध प्रसिद्ध माध्यमातून बातम्या प्रसारित होऊ लागल्या आहेत. या राजकीय बातम्या देताना काही स्वतःला प्रतिष्ठित समजणारे गाव पुढारी व स्वयंघोषित पक्षाचे कार्यकर्ते स्थानिक संस्थांचे प्रतिनिधी पत्रकारांवर दबाव तंत्राचा वापर करून संभाजी करण्याचा प्रकार समोर आला आहे. ही कृती लोकशाहीला व माध्यम स्वातंत्र्याला घातक आहे. 

        सुपा येथे नुकत्याच झालेल्या या घटनेने पत्रकारांमध्ये संतापाची लाट आहे. यापुढे अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी वेळीच संबंधिताविरुद्ध कारवाई करा असा पवित्र बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाने घेतला आहे. याबाबत राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या वतीने गंभीर दखल घ्यावी अन्यथा पत्रकार गांधीगिरी मार्गाने आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे. पत्रकारांच्या वतीने सामुदायिक सुपा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले.
To Top