Jawali News l म्हसवे गटात वसंतराव मानकुमरे यांचे उमेदवारीवर संदीप पवारांनी घेतलेला आक्षेप फेटाळला : गटात तीन तर गणात एक उमेदवार अवैध

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : सोमनाथ साखरे
जावली तालुक्यातील तीन गट व सहा गणांसाठी सुरु असलेल्या निवडणूकीच्या प्रकियेमध्ये उमेदवारांनी भरलेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया तहसिल कार्यालयात सुरु असताना म्हसवे गटाचे भाजपचे अधिकृत उमेदवार वसंतराव मानकुमरे यांच्यावर शिवसेनेचे संदिप पवार यांनी आक्षेप नोंदविल्याने काही काळासाठी वातावरण झाले असताना निवडूक निर्णय अधिकारी श्रीमती जयश्री मोरे यांनी सुनिवणी घेवुन आपेक्ष फेटाळून लावला.
             मेढा तहसिल कार्यालयात सकाळी ११ वाजता निवडूक निर्णय अधिकारी श्रीमती जयश्री मोरे यांनी प्राप्त उमेदवारांचे छाननीस म्हसवे गटा पासुन सुरुवात केली. यावेळी म्हसवे गटातील सर्व उमेदवार व सुचक उपस्थित होते. छाननी दरम्यान म्हसवे गटातील शिवसेनेचे उमेदवार संदिप पवार यांनी भाजपचे उमेदवार वसंतराव मानकुमरे यांचेवर कुणबी प्रमाणपत्र तसेच मानकुमरे पाईंट येथिल उत्खनना संदर्भात आक्षेप अर्ज दाखल केला. तसेच म्हसवे गटातील शरद मोरे व सचिन गोगावले यांचे जात प्रमाणपत्र नसल्याने तर कुसुंबी गटात समृद्धी गणपत पार्टे कमी वयामुळे तसेच कुसुंबी गणामध्ये मंदाकिनी राजेंद्र संकपाळ कागदपत्र अपूर्ण असल्याने छाननी दरम्यान अवैध ठविण्यात आले.
           छाननीची प्रक्रिया गट निहाय म्हसवे, कुडाळ आणि कुसुंबी पुर्ण झालेनंतर सहा गणांची प्रक्रिया सुरु करण्यात आली त्यामध्ये कुसुंबी गणातील भाजपचा उमेदवार सौ. पुष्पा चिकणे यांचेवर कर भरले नसलेबाबत आक्षेप घेतल्यानंतर कर पावती सादर करण्यात आल्याने त्यांचा अर्ज वैध ठविण्यात आला. 
          गट व गणांची छाननी प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती राजश्री मोरे यांनी म्हसवे गटातील भाजपचे उमेदवार वसंतराव मानकुमरे व शिवसेनेचे उमेदवार संदिप पवार यांची सुनावणी घेवुन दोघांचे युक्तवाद ऐकुन घेत संदिप पवार यांचे अपात्रतेच्या निकशात बसत नसल्याने सदरचा आक्षेप फेटाळून आले. भाजपच्या सर्वांचे निकालाकडे लक्ष लागुन राहीले असताना संदिप पवार यांचा आक्षेप फेटाळून लावल्याने आनंदाचे वातावरण पसरले.
          त्यामुळे  ३६ म्हसवे गटामध्ये ना म प्रवर्गाच्या जागेसाठी संदीप सर्जेराव पवार, दत्तात्रय किसन गावडे, सुरेश लक्ष्मण चव्हाण, वैशाली दत्तात्रय पांगारे, संतोष दिनकर शिराळे, अशोक चव्हाण, वसंतराव ज्ञानदेव मानकुंमरे, मिलिंद रामचंद्र नलावडे यांचे अर्ज वैध राहीले आहेत. 
            ३७  कुडाळ गट ना म प्र महिला जागेसाठी जयश्री संजय शेवते, स्वप्नाली राहुल ननावरे, प्रसन्न आशिष रासकर, कल्पना भानुदास फरांदे, पूनम प्रशांत नायकुडे, माधुरी प्रवीण गोरे, गीता लक्ष्मण लोखंडे, मोनाली महेश बारटक्के 
 आणि जयश्री मनीलाल गिरी यांचे अर्ज वैध ठरले आहेत. तसेच ३८ कुसुंबी गट सर्वसाधारण महिलेसाठी उषा उंबरकर, राजश्री शिंदे, कल्पना पार्टे, कविता ओंबळे, अर्चना रांजणे, माया धनावडे यांचे अर्ज वैध ठरले आहेत.
           तसेच ७१ खर्शी बारामुरे गणामध्ये शंकर सणस, विशाल सकपाळ, विठ्ठल गोळे, रविंद्र पार्टे, समीर गोळे, सुशिल गोळे, जगन्नाथ गावडे, रामदास पार्टे, विक्रांत गावडे, किरण गायकवाड, श्रीहरी गोळे, गोरख महाडिक आणि श्रीरंग गलगले तसेच ७२ म्हसवे गण सर्वसा महिला जागेसाठी निता शिंदे, छाया सुर्वे, पूनम दुर्गावळे, शिल्पा शिंदे, वैष्णवी करंदकर, अरुणा शिर्के, रेश्मा पोफळे, प्रतिभा परामणे आणि संगिता भिसे यांचे अर्ज वैध ठरले आहेत.
            तसेच ७३ कुडाळ सर्वसाधारण जागेसाठी राजेंद्र शिंदे, धनंजय केंजळे, वनिता रोकडे, सोमनाथ कदम, विरेंद्र शिंदे, राजेंद्र येवते, सौरभ शिंदे आणि प्रशांत तरडे तसेच ७४ सायगाव सर्व. सा. महिला जागेसाठी रेश्मा खरात, साक्षी देशमुख, उज्वला खरात, चारुशीला पवार, वैशाली सावंत आणि वंदना भोसले यांचे अर्ज वैध ठरले आहेत.
              तसेच ७५ आंबेघर तर्फ मेढा नामप्रवर्ग जागेसाठी जगनाथ शिर्के, अतिश कदम, संकेत पाटील आणि विजय सपकाळ तसेच ७६ कुसुंबी सर्वसाधारण महिला जागेसाठी  प्रणाली माने, सुरेखा चव्हाण, राजश्री शिंदे, श्रेया चव्हाण, वैशाली चिकणे, सुरेखा शेलार, सुनिता दुंदळे, पुष्पा चिकणे, लक्ष्मी चिकणे यांचे अर्ज वैध ठरले असून उमेदवारी माघार घेण्याच्या दिवशी निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार असून उमेदवारांची भावगर्दी कीती कमी होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
To Top