Pune News l प्रमोद काकडे यांना राजपिता शहाजीराजे आदर्श पालक पुरस्कार तर लक्ष्मीबाई माळशिकारे यांना राजमाता जिजाऊ आदर्श पालक पुरस्कार जाहीर

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील निंबुत येथील जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद भगवानराव काकडे यांना पालकत्व फाउंडेशनचा राजपिता शहाजीराजे आदर्श पालक पुरस्कार व कोऱ्हाळे येथील लक्ष्मीबाई विठ्ठलराव माळशिकारे यांना राजमाता जिजाऊ आदर्श पालक पुरस्कार जाहीर झाला आहे. 

पालकत्व फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे दरवर्षी राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ आदर्श पालक पुरस्कार दिला जातो. वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्या मातांनी आपल्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांसारखे घडवले अशा मातांना मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येतो. एका प्रातनिधिक मातेची ग्रंथ तुला करून सर्व मातांचा गौरव करण्यात येतो आणि वाचन संस्कृतीचा ही पुरस्कार केला जातो.

यावर्षी मुख्य पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्री सरिता गंगाधर फडणवीस यांना देण्यात येणार आहे. बारामती पंचक्रोशीतील जेष्ठ पत्रकार दत्तात्रय माळशिकारे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई माळशिकारे यांना यावर्षीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर बारामती पंचक्रोशीतील जेष्ठ राजकीय व सामाजिक नेते प्रमोद काकडे  यांनाही राजपिता शहाजीराजे आदर्श पालक पुरस्कार देण्यात येणार आहे.
फलटण येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांच्या मातोश्री नाही यावर्षी राजमाता जिजाऊ आदर्श पालक पुरस्कार दिला जाणार आहे. त्याचबरोबर सामाजिक व कला क्षेत्रात कार्यरत असणारे मकरंद अनासपुरे यांच्या मातोश्री महिलांना विश्वचषक वर्ल्ड कप जिंकून देणारे क्रिकेट कोच अमोल मुजुमदार यांच्या वडिलांनाही राजपिता शहाजीराजे आदर्श पालक पुरस्कार देण्यात येणार आहे.
           रविवार दिनांक 11 जानेवारी रोजी बालगंधर्व रंगमंदिर शिवाजीनगर पुणे येथे सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी हा कार्यक्रम सोहळा होणार असून कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री गिरीश प्रभुणे, खासदार सौ.मेधा कुलकर्णी, राजमाता जिजाऊंचे वंशज, जेष्ठ साहित्यिक राजन खान, ॲडव्होकेट रणजीत जाधवराव आणि सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉक्टर शितल मालुसरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन पालकत्व फाउंडेशन पुणे या संस्थेने केले आहे.
Tags
To Top