सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
17 वर्षांच्या मुलाचं अपहरण करून त्याची हत्या केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. सोशल मीडिया फेक प्रोफाइल बनवून मुलाला कात्रजच्या घाटात बोलावण्यात आले. आणि जुन्या वैमनस्यातून त्याची हत्या करण्यात आली. 29 डिसेंबर रोजी विश्रांतवाडीमध्ये राहणाऱ्या या 17 वर्षांच्या मुलाची हत्या केली गेली.
टिंगरेनगर येथील रहिवासी अमन सिंग सुरेंद्र सिंग गचंड हा 29 डिसेंबर रोजी सकाळी घरातून त्याच्या दुचाकीवरून बाहेर पडला. कामावर जात असल्याचं त्याने घरामध्ये सांगितलं, पण रात्री उशिरापर्यंत तो घरी आला नाही, त्यामुळे त्याची आई अनिता सुरेंद्र सिंग गचंड (वय 44) यांनी नातेवाईक आणि अमन याच्या मित्रांना फोन करून चौकशी केली, पण तरीही अमन सापडत नसल्यामुळे आईने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.
'मुलगा बेपत्ता झाल्यामुळे तसंच तो अल्पवयीन असल्यामुळे आम्ही तातडीने शोध सुरू केला. गुन्हे शाखेच्या पथकाने मुलाचा मोबाईल फोनचे रेकॉर्ड आणि तो बेपत्ता झाला त्या दिवसाचं त्याच्या लोकेशनची माहिती गेतली. तांत्रिक तपासाच्या आधारे आम्हाला त्याचं शेव
