सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कार्यक्रमाला अधिकृत सुरुवात झाली असून नामनिर्देशन पत्रांची विक्री सुरू होताच इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अवघ्या दोन दिवसांत तब्बल १६० उमेदवारी अर्जांची विक्री झाल्याने निवडणूक वातावरण तापू लागले आहे.
पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. नामनिर्देशन पत्रांची विक्री शुक्रवारपासून सुरू झाली असून पहिल्या दोन दिवसांत एकूण १६० अर्जांची विक्री झाल्याची माहिती पुरंदर निवडणूक कार्यालयाने दिली आहे.
पहिल्या दिवशी शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण ८७ उमेदवारी अर्जांची विक्री झाली, तर दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि.१७ जानेवारी) दुपारी तीन वाजेपर्यंत ७३ अर्जांची विक्री झाली आहे. यामुळे येत्या काही दिवसांत अर्ज विक्री व भरण्याच्या प्रक्रियेत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुरंदर तालुक्यात एकूण २३५ मतदान केंद्र असून एकूण मतदार संख्या १ लाख ८९ हजार ४०३ इतकी आहे. यामध्ये ९५ हजार २७१ पुरुष मतदार, ९४ हजार १२९ स्त्री मतदार आणि ३ इतर मतदारांचा समावेश आहे.
निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा देखील निश्चित करण्यात आली असून पंचायत समिती सदस्यांसाठी ६ लाख रुपये तर जिल्हा परिषद सदस्यांसाठी ९ लाख रुपये इतकी खर्च मर्यादा ठेवण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आगामी निवडणूक तालुक्याच्या राजकारणासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. नामनिर्देशन पत्रांची विक्री शुक्रवार पासून सुरू झाली आहे. आज शनिवार अखेर दोन दिवसांत १६० उमेदवारी अर्ज विक्री झाल्याची माहिती पुरंदर निवडणूक कार्यालयाने दिली आहे.
पुरंदर तालुक्यात एकूण २३५ मतदान केंद्र आहेत
पुरुष मतदार ९५ हजार २७१
स्त्री मतदार ९४ हजार १२९
इतर मतदार ०३
एकूण मतदार संख्या १ लाख ८९ हजार४०३ आहेत.
या निवडणुकीत उमेदवारांना खर्चाची मर्यादा पंचायत समिती करीत ६ लाख रुपये
जिल्हा परिषद करिता ९ लाख रुपये
पहिल्या दिवशी शुक्रवारी आज तीन वाजेपर्यंत एकूण ८७ अर्जांची विक्री झाली आहे
दुसऱ्या दिवशी शनिवारी आज दिनांक १७ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत ७३ अर्ज विक्री झाली.
