सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
१६ डिसेंबर २०२५ पासुन सभासदांचा सोमेश्वर कारखान्याकडे आलेल्या व पुढे येणा-या ऊसाच्या बिलातुन कोणतीही सोसायटी व व्यापारी बँकांची कर्ज वसुली करणार नसल्याचा निर्णय आज दि. ९ रोजी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या मासिक सभेत घेण्यात आला असल्याची माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
जगताप पुढे म्हणाले, शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत असुन संचालक मंडळाने प्रथम हप्त्यापोटी रु.३,३००/- प्र.मे.टन देण्याचे निश्चित केलेले आहेत. दि.१५ डिसेंबर अखेर ऊस बिले अदा केली आहेत. कारखान्याने आज अखेर ६ लाख ३४ हजार १३५ मे. टनाचे गाळप पुर्ण केले असुन जिल्हामध्ये ११.२७ टक्के प्रमाणे उच्चांकी साखर उतारा राखत ७ लाख १० हजार ६५० किंवटल साखर उत्पादन झाल्याची माहीती पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले.
जगताप पुढे म्हणाले कि, काखान्याचे कार्यक्षेत्रातील सभासद, बिगर सभासद यांनी नोंदलेला सर्व ऊसाचे वेळेत गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. संचालक मंडळाचे सभेमध्ये झालेल्या निर्यानुसार दि.१६ डिसेंबर २०२५ पासुन आलेल्या व पुढे येणा-या ऊसाच्या बिलातुन कोणतीही सोसायटी व व्यापारी बँकांची कर्ज वसुली करणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला असुन कर्ज वसुली ऐच्छीक करण्यात आली आहे.
तसेच कार्यक्षेत्रातील सभासद, बिगर सभासद यांचे माहे फेब्रुवारी २०२६ मध्ये येणा-या ऊसास प्रति टन रु.१००/-, माहे मार्च २०२६ मध्ये येणा-या ऊसास प्रति टन रु.२००/- व माहे एप्रिल २०२६ मध्ये येणा-या ऊसास प्रति टन रु.३००/- अनुदान देणेत येणार आहे.
जगताप पुढे म्हणाले कि, कारखाना कार्यक्षेत्रामध्ये मुबलक प्रमाणात तोडणी वाहतुक यंत्रणा उपलब्ध असुन ऊस तोडणीसाठी शेतक-यांनी पैसे देऊ नयेत. ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी झालेस कारखाना शेतकी खात्याशी संपर्क करावा तसेच सभासदांनी आपला ऊस जळीत करुन तोडणी करणेस संमती देवू नये.
कार्यक्षेत्रातील सभासद, बिगर सभासद यांनी कारखान्याकडे नोंदविलेला ऊस इतर कारखान्यास ऊस घालु नये अथवा अन्यत्र विल्हेवाट लावु नये असे अवाहन देखिल श्री जगताप यांनी यावेळी केले आहे.
