सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड : मीनल कांबळे
राजगड तालुक्यातील साखर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे रोखपाल अमोल रेणुसे यांच्या प्रामाणिकपणा मुळे जादा आलेले ग्रामपंचतीचे २० हजार रुपये परत देण्यात आले.
याबाबत माहिती अशी की मार्गासनी ग्रामपंचायतचे क्लर्क गणेश यादव हे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक साखर येथे ग्रामपंचतीचे घरपट्टीचे पैसे भरण्यासाठी गेले असताना त्यांनी जादा 20 हजार 700 दिले होते. परंतु रोखपाल अमोल रेणुसे यांनी प्रामाणिकपणा दाखवत ते पैसे परत केले. यावेळी शाखा व्यवस्थापक विकास कुमठे ग्रामसेवक यादव सरपंच शंकर रेणुसे अमोल रेणुसे लेखनिक राजेंद्र रांजणे व कनिष्ठ सेवक समीर मालुसरे राहुल रसाळ उपस्थित होते. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रेवणनाथ दारवटकर, निर्मला जागडे यांनी रोखपाल अमोल रेणुसे यांचे कौतुक केले.
