सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील १२ जिल्हा परिषद तर १२५ पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मंगळवारी जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा केली.
मुंबईतील मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यामुळे राज्याती १२ जिल्ह्यात निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत जिल्हापरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीविषयी माहिती दिली. निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले, 'सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णायनुसार ज्या ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण आहे. अशा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार १२ जिल्हापरिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यात येणार आहे.
राज्यातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर
छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशीव, लातूर या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील.
निवडणूक वेळापत्रक
नामनिर्देशन - पत्र स्वीकारणे १६ जानेवारी २६ ते २१
जानेवारी २६
छाननी - २२ जानेवारी
उमेदवारी माघारी अंतिम मुदत - २७ जानेवारी
अंतिम उमेदवार यादी निवडणूक चिन्ह वाटप - २७जानेवारी दुपारी साडेतीन नंतर
मतदान - ५ फेब्रुवारी
मतमोजणी - ७ फेब्रुवारी सकाळी १० पासून
