सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
रोज मातीत मी गं नांदते बाई नांदते,
ऊस लावते... बेणं दाबते...
बाई दाबते ,
नाही बेणं गं ...मन दाबते...
बाई दाबते,
कांड्या कांड्यानी संसार सांधते...
बाई सांधते,
रोज मातीत मी गं नांदते बाई नांदते.
अशाच रोज मातीत काम करत संसार उभ्या करणाऱ्या कष्टकरी महिला शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा वाणेवाडी येथे वार शनिवार,दिनांक 14 मार्च 2026 रोजी पार पडला.
निम्मित होते साद संवाद स्वच्छता ग्रुप वाणेवाडी च्या दहाव्या वर्धापन दिनाचे.आंतरराष्ट्रीय महिला दिन व 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून युनेस्को ने जाहीर केले आहे याचा समन्वय साधत साद संवाद ग्रुप ने साजरा केलेल्या अभिनव उपक्रमाचे. वाणेवाडी गावातील वाड्यावस्त्यावरील 21 महिला शेतकरी यांचा सन्मान चिन्ह व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. त्यामध्ये, विमल हिंदुराव भोसले,सुमन बापूराव शेटे-चव्हाण सुवर्णा मोहन भोसले,सुजाता संभाजी मुळीक,संगिता जितेंद्र चव्हाण,छाया राजेंद्र जाधव,अनिता महेंद्र भोसले,सुवर्णा हंबीरराव जगताप,गव्हाबाई जालिंदर मोहोळकर,हिराबाई हनुमंत शिंदे,मंदाबाई हनुमंत कोंडे -देशमुख, बायसाबाई बबन गाडेकर,शोभा केशव जगताप,शीलाराणी नितीन भोसले,संगिता तानाजी जाधव,छाया आवटे,लैला सय्यद,संगिता नानासो बामणे,हिराबाई सदाशिव पवार,कमल दत्तात्रय कोळेकर व शोभा सुनील शेळके.
यासोबत गावातील पहिली महिला सीए म्हणून मान मिळवणारी वैभवी विजयानंद जगताप, स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये निवड झालेली भाग्यश्री दिलीप साळुंखे व सैनिक स्कूल प्रवेश परिक्षेत उत्तुंग यश मिळवून कुर्डूवाडी येथील सैनिक स्कूल मध्ये प्रवेश मिळवलेली गायत्री अमोल भोसले या गुणवंतांचा विशेष सत्कार व सन्मान करण्यात आला. यासोबत महिला दिनाच्या निमित्ताने प्रसिद्ध कलाकार रुचिका राजेश खोत यांचा 'बांधारिचे बाय गं' हा सांगितिक नाट्यप्रयोग आयोजित केला होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी वाय जगताप यांनी केले. सोमेश्वर कारखान्याने अध्यक्ष पुरुषोत्तम रामराजे जगताप यांनी मनोगत व्यक्त करताना महिलांच्या शेतीतील कार्याचा गौरव केला.व साद संवाद ग्रुप च्या दहाव्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या व आजपर्यंतच्या उपक्रमांची प्रशंसा केली .सूत्रसंचलन प्राजक्ता सोळस्कर , अपर्णा जेधे व अमृता नांदखिले यांनी केले आभार प्रदर्शन गणेश सावंत यांनी केले.
