सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
दुष्काळामध्ये अडचणी सापडलेल्या गरजू आणि शेतकरी कुटुंबाची दिवाळी गोड व्हावी, यासाठी माऊली उद्योग समूहाच्यावतीने सामाजिक भावनेतून मदतकार्य राबविण्यात आले.
बाबुर्डी ( ता. बारामती ) अंतर्गत असलेल्या शेरेचीवाडी येथील प्रणित कुदळे यांनी शेरेचीवाडी, कोकरे वस्ती आणि बाबुर्डी येथील गरजू आणि गरीब सुमारे ३२ कुटुंबांना दिवाळीनिमित्ताने जीवनावश्यक किराणा साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.
या किटमध्ये रवा, मैदा, तेल, तूप, बेसन, साखर, भाजका पोहा, मका पोहा, चिवडा मसाला आदी दिवाळी उपयोगी किराणा वस्तूंचे वाटप शेरेचीवाडी येथील माऊली उद्योग समूहाचे प्रणित कुदळे यांनी केले. या कीटमुळे त्यांची दिवाळी गोड होणार आहे.
या सामाजिक उपक्रमात प्रणित कुदळे, राहुल लडकत, नानासाहेब लडकत, दादासाहेब लडकत, बाळासाहेब कुदळे, सचिन कुदळे, राजेंद्र कुदळे आदींनी सक्रीय भाग घेतला.
.................................


