Baramati Crime l बारामतीत महिलेवर वारंवार अत्याचार; पती व मुलाला जीवे मारण्याची धमकी, आरोपी अटकेत!


सोमेश्वर रिपोर्टर टीम---- 

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 

महिलेच्या संमतीशिवाय वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून, याबाबत कोणाला सांगितल्यास पती व मुलाला जीवे मारण्याची तसेच आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी अक्षय अजित तावरे (रा. थोपटेवाडी, कोऱ्हाळे बुद्रुक, ता. बारामती, जि. पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ एप्रिल २०२६ रोजी रात्री १०.४५ वाजल्यापासून ते ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.४५ वाजेपर्यंत मौजे थोपटेवाडी, कोऱ्हाळे बुद्रुक येथील दोन वेगवेगळ्या घरांमध्ये आरोपीने फिर्यादी महिलेच्या संमतीशिवाय वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तसेच या प्रकाराबाबत पतीला सांगितल्यास पती व मुलाला जीवे मारण्याची आणि शारीरिक संबंधांचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी आरोपीने दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी अक्षय अजित तावरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(२)(m), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुलाणी या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.

To Top