मुरूम ग्रामस्थांचा निर्णय- वर्गणी नाही आणि यात्रा पण नाही

Pune Reporter
मुरूम ग्रामस्थांचा  निर्णय- वर्गणी नाही आणि यात्रा पण नाही

सोमेश्वरनगर   दि. १७ एप्रिल


कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी  मुरूम ग्रामस्थांनी भैरवनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, 
           यात्रेची मिटिंग, वर्गणी, देवाचा छबिना, लोककला नृत्य, कुस्त्या, सांस्कृतिक कार्यक्रम हे सर्वच कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय मुरूम ग्रामस्थांनी घेतला आहे. या अगोदर वाणेवाडी, वाघळवाडी, निंबुत या गावांच्या यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत.   याच धर्तीवर मुरूम ग्रामस्थांनी देखील यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 
           दि २७ आणि २८ रोजी भैरवनाथ यात्रा होणार होती, मात्र कोरोनाचा संकटामुळे ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय समस्त ग्रामस्थ मुरूम यांनी घेतला आहे.
To Top