प्राथमिक शिक्षकांनी मुलांनाच जुंपले सर्वेच्या कामाला- सोमेश्वरनगर परिसरातील प्रकार

Pune Reporter
प्राथमिक शिक्षकांनी मुलांनाच जुंपले सर्वेच्या कामाला-  सोमेश्वरनगर परिसरातील प्रकार

सोमेश्वरनगर  दि  १६  एप्रिल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यात  प्राथमिक शिक्षकांना गावातील नागरिकांचा सर्व्हे करण्यासाठी सांगण्यात आले आहे, मात्र या शिक्षकांनी चक्क शाळेतील मुलांनाच सर्व्हे साठी जुंपल्याची बाब सोमेश्वरनगर परिसरात उघड झाली आहे. 
         बारामती शहरात कोरोनाचे सात रुग्ण सापडल्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना या आजारावर मात करण्यासाठी एकीकडे  देशात आदर्शवत ठरेल असा बारामती पॅटर्न राबविला जात असताना दुसरीकडे मात्र असे प्रकार घडत आहेत. 


         बारामती तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना घरोघरी जाऊन कुणाला सर्दी, खोकला, ताप, इतर कुठला आजार आहे का, परदेशवारी, शहरातून आलेले आहेत का, नाव, वय मोबाईल नंबर अशी माहिती जमा करून प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये दुपारी २ वाजेपर्यंत जमा करावयाची आहे. यानंतर ग्रामपंचायत ही माहिती तालुक्याच्या गटविकास आधिकाऱ्यांना पाठवीत आहे. 
           हे काम प्रथिमिक शिक्षकांना सांगण्यात आले असून हे शिक्षक मात्र शाळेतील मुलांना ही माहिती जमा करण्यासाठी राबवून घेत असल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

वास्तविक हे काम शिक्षकांनीच करणे अपेक्षित आहे. याबाबत चौकशी करून पुढील कार्यवाही करू

राहुल काळभोर- गटविकास अधिकारी बारामती
To Top