महावितरण ला 'सोमेश्वर' च्या कोजनचा 'आधार'
सोमेश्वरनगर दि १५ एप्रिल
सोमेश्वर कारखान्याच्या कोजन प्रकल्पामुळे गेल्या अनेक वर्षापासून सोमेश्वर महावितरण अंतर्गत येणाऱ्या पाच सबडिव्हिजन मधील जवळपास ३५ गावातील शेतकऱ्यांना उच्च दाबाने विजपुरवठा करू शकत असल्याचे मत सोमेश्वर महावितरण चे उपविभागीय अभियंता सचिन म्हेत्रे यांनी दिली.
आज लोणंद या ठिकाणी महावितरण येथे आग लागून बिघाड झाल्यामुळे २४ तासापेक्षा अधिक काळ वीजपुरवठा खंडित राहणार आहे, सोमेश्वर ला लोणंद वरून येणारा वीजपुरवठा खंडित झाला आहे, मात्र सोमेश्वर कारखान्याच्या सहवीजप्रकल्पातून तयार होणाऱ्या विजेमुळे आपण सोमेश्वर महावितरण अंतर्गत येणाऱ्या गावांना कमीत कमी सिंगल फेज वीज उपलब्ध होणार असल्याची माहिती सोमेश्वर उच्चदाब उपकेंद्राचे उपकार्यकारी अभियंता तुषार वाळिंबे यांनी दिली. सचिन म्हेत्रे पुढे म्हणाले की लोणंद कडून येणारी वीज बंद झाली असून सोमेश्वर अंतर्गत येणाऱ्या निंबुत, मुरूम, वडगाव निंबाळकर, होळ आणि कोऱ्हाळे जवळपास ३० ते ३५ गावातील लोकांना करखान्याच्या कोजन मुळे आपण सिंगल फेज तरी वीज देऊ शकणार आहोत. सोमेश्वर कारखाना हा २३ मेगावॅट विजेची निर्मिती करतो यापैकी १६ मेगावॅट वीज ही महावितरण खरेदी करतो, उन्हाळ्याध्ये शेतीसाठी कमी प्रमाणात विजेचा दाब उपलब्ध होतो, मात्र कारखान्याच्या कोजन मुळे विजेचा दाब संतुलित ठेवता येत आहे. कारखान्याचा कोजन प्रकल्प असल्यामुळे १३२/३३ या उच्च दाबाने वीज उपलब्ध होत आहे, यामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांची विजेची गरज आपण भागवू शकत असल्याचे मत सचिन म्हेत्रे यांनी दिली.
COMMENTS