ज्युबिलंट भारतीया फाऊंडेशन तर्फे १५० कुटुंबांना मदत

Pune Reporter
ज्युबिलंट भारतीया फाऊंडेशन तर्फे १५० कुटुंबांना मदत

सोमेश्वरनगर   दि ७ एप्रिल

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला.त्यामुळे समाजातील वंचित व गरजू घटकांना मदतीचा हात देण्याकरीता ज्युबिलंट भारतीया फाऊंडेशन तर्फे मदत करण्यात आली आहे. नीरा गावात राहणाऱ्या १५० हुन अधिक गरीब कुटुंबाना सॅनिटायझर व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप  करण्यात आले आहे. याप्रसंगी ज्युबिलंट लाईफ सायन्सेसचे उपाध्यक्ष सतीश भट,एच आर हेड दीपक सोनटक्के,जनसंपर्क अधिकारी इसाक मुजावर,ऍडमिन हेड  गुरुदयाल सिंग,सिक्युरिटी मॅनेजर युवराज काळे, ज्युबिलंट भारतीया फाऊंडेशनचे अजय ढगे,महसूल विभागाचे मंडल अधिकारी संदीप चव्हाण,नीरा ग्रामपंचायतचे  ग्रामसेवक मनोज ढेरे आणि इतर ग्रामपंचायत  पदाधिकारी या मोहिमेत सहभागी होते.
To Top