अनं. . . सोमेश्वर कारखान्याच्या रस्त्यांने घेतला मोकळा श्वास
सोमेश्वरनगर दि ७ एप्रिल
कोरोना रोगाने जगामध्ये धुमाकुळ घातला आहे .दि ६ रोजी बारामती शहरामध्ये दुसरा कोरोना रुग्ण आढळला तो रुग्ण भाजी विक्रेता आहे त्यामुळे बारामती शहरासह तालुक्यामध्ये खळबळ उडाली.
बहुतांशी गावांनी आठवडे बाजार बंद आहे त्यामुळे शेतकरी व भाजी विक्रेते हे गावातील मुख्य चौक व मुख्य रस्त्यालगत भाजी विक्री करण्यासाठी बसत असतात दररोजच ताजी भाजी खरेदी करण्यासाठी असंख्य ग्राहक सोमेश्वरनगर परिसरात येत असतात त्यामुळे कोरोना रोगाचा फैलाव होण्यासाठी हे पूरक वातावरण निर्माण होत आहे .सोशल डिस्टन्सचा फज्जा उडालेला दिसत असतो .त्यातच काल बारामती शहरामध्ये एका भाजीविक्रेता कोरोणा बाधित असल्याचे आढळल्यामुळे सर्वांनी धसका घेतला आहे .
त्यामुळे बारामती तालुक्यातील ग्रामीण भाग सतर्क झाला आहे सोमेश्वरनगर परिसरातील युवा कार्यकर्ते ,पत्रकार संघ व आपत्कालीन व्हॉट्सअॅप ग्रुपमधील सदस्यांनी काल दि ६ सायंकाळी सोमेश्वरनगर मुख्य चौकांमध्ये व कारखाना रस्त्यावरती भाजी विक्री करणाऱ्या शेतकरी व विक्रेत्यांना भाजी विक्री करण्यास बसू नये आपण ग्राहकांना थेट त्यांच्या घरी जाऊन होम डिलिव्हरी द्यावी असे आव्हान केले आहे .
यावेळी बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश जगताप, वाघळवाडीचे उपसरपंच जितेंद्र सकुंडे, पत्रकार युवराज खोमणे,तुषार धुमाळ, सदस्य हेमंत गायकवाड, ऋषिकेश गायकवाड, निलेश गायकवाड,विकास सांवत,गंगाराम कामठे(दैनिक वितरक )आरोग्य सेवक परवेज मुलाणी, पोलीस नाईक नितीन बोराडे उपस्थित होते.