धक्कादायक.... बारामतीत कोरोनाचा दुसरा रुग्ण सापडला
सोमेश्वरनगर दि ६ एप्रिल
बारामती शहरातील समर्थनगर परिसरात भाजीपाला विक्री करणा-या एका व्यावसायिकास कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे आज सिध्द झाले आहे. या नंतर समर्थनगर हे केंद्र धरुन तीन किलोमीटरचा परिसर कटेंनमेंट झोन म्हणून तर पाच किलोमीटरचा परिसर बफर झोन जाहीर केल्याची माहिती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.
दरम्यान, अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आले आहे. अनेक लोकांना याची बाधा झाली असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रशासनाने आता संबंधित लोकांचा तपास सुरू केल
या घटनेनंतर आता बारामतीकरांनी घराबाहेर पडू नये असे आव्हान कांबळे यांनी केले आहे. पोलिसांनी हा परिसर सील केलेला असून प्रत्येक वाहन तपासणीनंतरच सोडले जाणार हे. पोलिसांनी या ठिकाणी चौकी लावलेली असून या भागातील लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. रिक्षाचालक कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती सुधारत असताना व इतरांची टेस्ट निगेटीव्ह आली असताना आता भाजीविक्रेता कोरोनाबाधित निघाल्याने बारामतीकरांची झोप उडाली आहे.