पंतप्रधान मोदींच्या मूळ उद्देशाला सुरुंग
सोमेश्वरनगर दि ५ एप्रिल
संकट काळात देश एक असल्याची भावना प्रज्वलीत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री 9 वाजता 9 मिनिटं दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. समस्त देशवासियांनी त्यांच्या अवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. पुणे शहरासह सर्वच तालुक्यात शहाण्या लोकांनी दिवे लावले, पण दिडशहाण्यांनी फटाके, रॉकेट, भुइनळे लावून मोदींच्या मुळ उद्देशाला सुरुंग लावला.
जगभरात कोरोनाच्या विषाणूने धुमाकूळ घातला आहे. भारतात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. कोरोनाच्या महामारीला हरविण्यासाठी देश एकसंघ असण्याची गरज आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरातील लाईटस बंद करून 9 वाजता 9 मिनिटं दिवे लावण्याचे अवाहन केले होते. अनेकांनी त्यांच्या अवाहनाला प्रतिसाद दिला. ग्रामीण भागात जवळपास सर्वच भागातील नागरिकांनी 9 च्या ठोक्याला लाइटस् ऑफ करून घरासमोर, अंगणात, गॅलरीत दिवे लावले. दिपावलीची अनुभूती या निमित्ताने येत होती.