संचारबंदीत क्रिकेट खेळणाऱ्यांना १४ जणांना दाखवला पोलिसी खाक्या

Pune Reporter
संचारबंदीत क्रिकेट खेळणाऱ्यांना  १४ जणांना दाखवला पोलिसी खाक्या 

सोमेश्वरनगर दि ५ एप्रिल 


कोरोना रोगाने संपूर्ण जगामध्ये धुमाकूळ घातलाय, भारतामध्ये या रोगामुळे अनेक लोक दगावले आहेत. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॅाक डाऊन जाहीर केला आहे प्रशासनाकडून सर्व नागरिकांना सांगण्यात आले की संचारबंदीचे  काटेकोरपणे पालन करावे पण निंबुत ता बारामती येथील लक्ष्मीनगर परिसरामध्ये आज दि ५ रोजी  संचारबंदीचे उल्लंघन करून क्रिकेट खेळत असणाऱ्या चौदा युवकांवर पोलिसांनी आज कारवाई केली .त्या युवकांना संचारबंदीचे पायमल्ली केल्या कारणाने चांगलाच पोलिसी खाक्या पाहावयास मिळाला .
            वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दि ५ रोजी दुपारच्या सुमारास निंबुत गावातील लक्ष्मीनगर या ठिकाणी संचारबंदी असतानाही काही युवक क्रिकेट खेळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या सर्व युवकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन संचारबंदी चे उल्लंघन होणार नसल्याचे लिहून घेत समज देत त्यांना सोडून देण्यात आले. वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेंद्र फणसे, पोलीस नाईक नितीन बोराटे, काशीनाथ नागराळे, लोकरे,  होमगार्ड असिफ शेख यांनी ही कारवाई केली.
To Top