सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

जिल्‍हाधिकारी कार्यालयात कामगार तक्रार निवारण कक्ष स्‍थापन- जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

जिल्‍हाधिकारी कार्यालयात कामगार तक्रार निवारण कक्ष स्‍थापन- जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम


पुणे, दि  ४  एप्रिल 

कोरोना विषाणूचा (कोविड-19 ) प्रादुर्भावाच्‍या अनुषंगाने लॉकडाऊनच्‍या  कालावधीत पुणे जिल्ह्यातील विस्थापित कामगार / मजूरांच्या समस्यांची सोडवणूक करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात विस्थापित कामगार तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली असल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
          या   कक्षाच्‍या कामकाजाकरिता  2 तहसिलदार, 3 नायब तहसिलदार व अन्य 7 कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली असून या  कक्षाचे कामकाज 24X7 सुरु राहणार आहे. विस्थापित कामगारांच्या समस्याकरिता स्थापन केलेल्या या कक्षाचा संपर्क क्रमांक 020 26111061 असा असून भ्रमणध्वनी क्रमांक 7517768603 असा आहे.


            या  कक्षास प्राप्त होणाऱ्या तक्रारींपैकी बांधकाम मजूर, दुकाने व आयटी कंपन्यांमधील कामगारांच्या समस्यांकरिता कामगार उप आयुक्त  व्ही. सी. पनवेलकर (भ्रमणध्वनी क्रमांक 9822348676) यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या कार्यालयाचा संपर्क क्रमांक 020/25541617,020/25541619  हा आहे. त्याचप्रमाणे कारखाना अधिनियम, 1948 अंतर्गत कामगारांच्या तक्रारींच्या निराकरणासाठी समन्वय अधिकारी म्हणून  औदयोगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सह संचालक विजय यादव ( भ्रमणध्वनी क्रमांक 7020065507 आणि दूरध्वनी क्रमांक 02027373022) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


                                    91हजार 938 कामगारांना भोजनाची सुविधा- जिल्‍हाधिकारी


    विस्थापित कामगारांकरिता पुणे जिल्ह्यात जिल्हा प्रशासनामार्फत 50 निवारागृहे, साखर कारखान्यांमार्फत 110 निवारागृहे सुरु करण्यात आली असल्याचेही जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.  जिल्हा प्रशासनामार्फत सुरु करण्यात आलेल्या 50 निवारागृहांमध्ये एकूण 3 हजार 442 विस्थापित कामगार व साखर कारखान्यांमार्फत सुरु केलेल्या निवारागृहांमध्ये एकूण 34 हजार 246 कामगार वास्तव्यास आहेत. सद्यस्थितीत अशासकीय स्वयंसेवी संस्था व जिल्हा प्रशासनामार्फत 3442 कामगारांना तसेच विविध ठेकेदारांमार्फत 88 हजार 496 कामगारांना अशा एकूण 91 हजार 938 कामगारांना भोजनाची सुविधा पुरविण्यात येत असल्‍याचेही  जिल्हाधिकारी तथा  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्‍यक्ष नवल किशोर राम यांनी दिली.


            दिनांक 1 एप्रिल, 2020 ते दिनांक 3 एप्रिल, 2020 अखेर सदर कक्षात विस्थापित कामगारांच्या एकूण 349 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 220 तक्रारीचे महसूल विभागामार्फत निराकरण करण्यात आले असून उर्वरित तक्रारींचे निराकरण करण्याचे काम सुरु असल्याची माहिती उपजिल्‍हाधिकारी सुभाष भागडे यांनी दिली.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7047,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : जिल्‍हाधिकारी कार्यालयात कामगार तक्रार निवारण कक्ष स्‍थापन- जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम
जिल्‍हाधिकारी कार्यालयात कामगार तक्रार निवारण कक्ष स्‍थापन- जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम
https://lh3.googleusercontent.com/-sz_gSjJZ8IY/XoiHXKGNpAI/AAAAAAAAAXQ/vm5UL5AfT78IxCqCAvXNi-iuDomAHjEfgCLcBGAsYHQ/s1600/1586005847352505-0.png
https://lh3.googleusercontent.com/-sz_gSjJZ8IY/XoiHXKGNpAI/AAAAAAAAAXQ/vm5UL5AfT78IxCqCAvXNi-iuDomAHjEfgCLcBGAsYHQ/s72-c/1586005847352505-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/04/blog-post_11.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/04/blog-post_11.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy